घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ म्हणणाऱ्यांना पुष्पा कांबळे दिले भीमटोला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे : जिल्हा प्रतिनिधी
देहूरोड दि १५ :- दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर शाखा अध्यक्ष संजय आगळे यांच्या अध्यक्षतेखाली पंडित चाळ, गांधीनगर, देहूरोड येथे बुद्ध विहाराचे भूमिपूजन व नामफलक अनावरण सोहळा सह मिठाई वाटप करुन संपन्न करण्यात आला,
याप्रसंगी नाम फलकाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते परशुराम भाऊ दोडमणी यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम महिला संरक्षण उपाध्यक्षा आशाताई गायकवाड, पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण सचिव राजेंद्र बडेकर, सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई राऊत, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार, मावळ तालुका उपाध्यक्ष मनसेचे नेते मोजेस दास, रेडियम कला आर्ट संजय शेंडे, बाबा चव्हाण, नरेश कांबळे, सिताराम, तौफीक रंगरेज,मानव आधार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमटकर इत्यादी उपस्थित होते,
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदर्शांचे दीप, धूप आणि पुष्पांनी पूजन करण्यात आले,संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे यांनी सामुदायिक सूत्तपठ्ठन घेतले,
नामविस्तार दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करत असताना "घरात नाही पीठ" "कशाला पाहिजे विद्यापीठ" असे म्हणणाऱ्यांना सांगू इच्छिते आज बहुजन समाज महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालत असताना आमच्या "घरात पीठ ही आहे आणि विद्यापीठ ही आहेत" असे मत भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखेच्या सन्माननीय अध्यक्षा पुष्पा संजय कांबळे यांनी मांडले, या प्रसंगी असे म्हणताच उपस्थित उपासक उपासिकाने जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो, संविधानाच्या विजय असो एकच नारा देत बाबासाहेबांचे जयजयकार केला.
याप्रसंगी राजेंद्र बडेकर, प्रकाश कांबळे रुईकर, राहुल गायकवाड, आशा गायकवाड, रामदास ताटे, परशुराम भाऊ दोडमणी या मान्यवरांनी नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या कर्तुत्वाला नमन केले , सर्वांना नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष संजय आगळे म्हणाले परशुराम भाऊ दोडमने यांच्या सहकार्यातून उभे राहत असलेले बुद्ध विहार येत्या काळात गांधीनगर सह देहूरोड शहर व पंचक्रोशीतील बांधवांना प्रेरणादायी ठरणार आहे या विहारात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून बालसंस्कार शिबिर, उपासिका शिबिर, समता सैनिक दलाचे शिबिर राबवून तरुणांना सुसंस्कारित बनवण्याचे कार्य होईल, बहुजन मुले वाईट मार्गाने वळणार नाहीत यासाठी प्रयत्न केले जातील भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेला माणूस घडवण्याचा कारखाना संबोधला जातो याकरिता देहूरोड शहर व पंचक्रोशीतील बांधवांनी आपल्या कमाईतील विसावा हिस्सा बुद्ध विहारासाठी दान करावा असे आवहान यावेळी संजय आगळे यांनी केले,सर्वांची साथ मिळाली तर आपण एका महिन्यात बुद्ध विहाराचे उद्घाटन बाबासाहेबांचे नातू व भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ .भीमराव साहेब यशवंत आंबेडकर त्यांच्या उपस्थितीत विहाराचा लोकार्पण सोहळा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया असे आश्वासन दिले व उपस्थित मान्यवरांचे धन्यवाद मानले.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा महिला सरचिटणीस नीलम काकडे, हिशोब तपासणीस संजीवनी चव्हाण, संस्कार सचिव पुष्पा सोनवणे, संघटक ताराबाई भालेराव, शिल्पा शेंडे,हिराबाई राक्षे, सुरेखा दोडमणी, कविता कांबळे, वैशाली दोडमणी, अंजुम रंगरेज, जेव्हा रबी सारोळा, रिजवाना रंगरेज राशीदा रंग रज गुलशन रंगरेज अफसाना रंगरेज, नाजमा रंगरेज, तरनूम रंगरेज, मेहारून रंगरेज,मुशइल रंगरेज,फरीदा खान,कसाना सरफराज,सालेमून शेख, निशा कांबळे, संजू देवी पासवान, नंदा अनागोंदी, राशिदा रंगरेज, नुरजान, मंसूरी, कुसुम कांबळे, प्रमिला कुमरकुंहा, राजश्री कांबळे, इंदुताई कांबळे सह गांधीनगर व परिसरातील बंधू भगिनी उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना सर्व उपस्थित बांधवांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष सु.भा. पवळ यांनी मानले. उपस्थित उपासक उपासिकाने बुद्ध विहार साकार होण्यासाठी उत्फुर्स पणे धम्म दान दिले. विहार साकार करण्यासाठी जे काही साहित्य वस्तू लागेल तसेच धम्म दान देण्यासाठी परशुराम दोडमणी संजय आगळे डॉ रामदास ताटे विजय पवार यांच्याशी संपर्क साधावा असे ही आवाहन करण्यात आले.