माता जिजाऊने जशी शिकवण शिवबाला दिले तसेच प्रत्येक आईनी मुलांना शिकवण देणे व देशात समानता प्रस्थापित करण्याची गरज :- संजय आगळे
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे : जिल्हा प्रतिनिधी
देहूरोड दि १३ :- सावित्रीबाई फुले जयंती निमित्त देहूरोड येथील धम्म सदन येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर शाखा महिला व पुरुष कार्यकारिणी यांच्यावतीने धम्म सदन शितळानगर देहूरोड येथे १२ जानेवारी २०२५ रोजी जयंती महोत्सव साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बुद्ध महासभेचे देहूरोड शाखेचे अध्यक्ष संजय आगळे हे होते सर्वानुमते अनुमोदन कोषाध्यक्ष सु.भा. पवळ यांनी दिले तर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचे दीप धूप,पुष्पांनी पूजन करून संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे व महिला संस्कार उपाध्यक्षा संगीता बनसोडे यांच्या उपस्थितीत सामुदायिक सूतपटन घेण्यात आले,
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने मोहन शिंदे यांच्याद्वारे वंदन गीत घेण्यात आले तर संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे यांच्याद्वारे बौद्ध धम्मात पौष पौर्णिमेचे महत्त्व सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले व उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आला कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा पश्चिम संरक्षण उपाध्यक्ष आशा गायकवाड उपस्थित होत्या, याप्रसंगी राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांनी सुंदर असे वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली, सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने समता सैनिक दलाच्या सैनिक प्रीती प्रकाश कांबळे यांनी मी सावित्रीबाई फुले बोलते हे एकपात्री नाट्यप्रयोग करून मन जिंकले खऱ्या अर्थाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन समाजप्रबोधन केले उपस्थितांनी या एकपात्री नाट्य प्रयोगाला उत्तम प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले तर उपस्थित महिला पदाधिकारी देहूरोड शाखा महिला अध्यक्षा पुष्पा संजय कांबळे, आशा माने,पुष्पा सोनवणे, संजीवनी चव्हाण, संगीता बनसोडे, शिल्पा शेंडे सह यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी समता सैनिक दलाचे सैनिक आप्पासाहेब वाघमारे प्रकाश कांबळे रुईकर सह शकुंतला आगळे, छाया शिंदे, नीलम काकडे, दिशा कांबळे इत्यादी महिला व पुरुष देहूरोड शाखा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष संजय आगळे म्हणाले राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला दिलेले संस्कार खऱ्या अर्थाने प्रत्येक आईने आपल्या मुलांना देण्याची गरज आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना दिलेली शिकवण याची कृतज्ञता अंगीकरण करणे व देशात समानता प्रस्थापित करण्यासाठी व कार्य करण्यासाठी साठी सर्वानी कटिबद्ध राहावे असे आव्हान अध्यक्ष संजय आगळे यांनी केले, तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार सचिव राकेश आव्हाड यांनी केले, आभार प्रकट कोषाध्यक्ष सु.भा. पवळ यांनी मानले.