भारतीय संविधान सन्मान समिती रॅली च्या वतीने तसेच मनसे पक्ष, ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन,मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा.
प्रेस मीडिया लाईव्ह :
देहुरोड दि. १४ :- मामुर्डी साईनगर तिरंगा कॉलनी आजाद नगर स्नेहा सोसायटी मामुर्डी गाव येथील नागरिकांचे मूलभूत प्रश्न समस्यासाठी राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन आणि शाहु फुले आंबेडकर मंच विचार च्या वतीने २५०/३००घरांना सुख सुविधा मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तर आंदोलनाचे आज दुसरा दिवस आहे.
साईनगर मामुर्डी आझाद नगर हे सन १९९७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये समाविष्ट झालेली गावे आहेत आज २२ वर्ष झाले आहे पण आज तगायत या भागात ड्रनेज लाईन,पाणी पुरवठा, लोकांनी घराघरात शौचालय बनविले आहे पण मलनीसरण केंद उपलब्ध नसल्याने तसेच भुमीगत ड्रेनेज लाईन नाही लाईट साठी भुमीगत लाईन नाही पीण्याचे पाईप लाईन खुपच जुने असल्याने अनेक ठिकाणी तुटलेले अवस्थेत आहेत अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य, सर्व रस्ते कच्चे स्वरुपाचे आहे पण कर (टेक्स) मात्र भरमसाठ वसुल केली जाते साफसफाई च्या नावाने बोंबाबोंब आहे तसेच शेतकरी जमीनी संदर्भात महानगरपालिका उदासीनता दाखवत आहे जमीनी तर नगरपालिकेने ताब्यात घेतले आहे पण याचा मोबादला मात्र या शेतकऱ्यांना अद्याप दिलेल्या नाही, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे ऐशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून विख्यात आहे महापालिका स्मार्टसीटी म्हणून मिरवित आहे पण या साईनगर मामुर्डी आझाद नगर यांची परिस्थिती एखादे खेडे गावा सारखे झाले आहे, या सर्व गंभीर समस्या साठी फुले शाहू आंबेडकर विचारमंच आणि राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन व गावकरीच्या वतीने धरणे आंदोलन आमरण उपोषण आणि जाहीर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे, या बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना १०/१/२०२५ रोजी वरील समस्या साठी पत्र देण्यात आले होते जर समस्या पुर्ती नाही झाले तर १३/१/२०२५ पासुन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला पण अद्याप या कडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेला दिसत आहे या बाबत प्रेस मीडीया लाईव्ह चे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांनी उपोषणक्त्यांचे मुलाकात घेतले असता येथील नागरिकांनी अनेक समस्या प्रेस मीडीया लाईव्ह च्या प्रतिनिधी समोर मांडले आज मामुर्डी साईनगर गावाचा परिस्थिती फारच बिकट आहे साफसफाई च्या नावाने तर बोंबाबोंब आहेच तसेच रस्ते पाणी वीज यांचे समस्या अधिक आहे, तसेच रस्ते फारच छोटे आहे आज गोदरेज महिंद्रा सारखे मोठ मोठ्या कंपनी तसेच मोठ मोठ्या इमारती झोलेले आहेत यामुळे लोकवस्ती वाढलेल्या आहेत इमारती निर्माण चे कार्य जोरात चालू असल्याने साईनगर मामुर्डी रोड वर या इमारतीसाठी डबर डस्ट क्रॅश रेती सिमेंट घेऊन येण्या जाण्या साठी मोठ मोठे डंपर गाड्यांचे वाहतूक वाढली आहे त्यामुळे चाकरमानी तसेच अनेक विद्यार्थी या रस्त्याने दुचाकी चारचाकी सायकल सारखे वाहानाने ये जा करत असताना अनेक वेळा अपघात घडले आहे रस्ते फारच खराब व अरूंद असल्याने नागरिक जीव मुठीत धरून ये जा करीत आहेत अनेक वेळा अपघात घडले आहे तर अपघातात एखाद्याचे जीव गेले तर याला जबाबदार कोणाला धरायचे असे प्रश्न उपस्थित करत आपले व्यथा मांडले, तर अपघाता घडु नये यासाठी खड्डी डबर डस्ट क्रॅश घेऊन जाणारे हे गाड्या मुकाई चौक मार्गाने गहुंजे कडे जाणारा रस्ते कडे वळवुन नेण्यात यावे अशी मागणी येथील महिला पुरुष नागरिक करत आहेत.
या आंदोलन बाबत शाहु फुले आंबेडकर मंच व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन च्या उपोषण कर्त्याच्यावतीने जर येत्या दिवसात मागणी केल्या प्रमाणे समस्या सुटले नाही तर आम्ही पाणीच्या टाकीवर चडुन शोले स्टाईल आंदोलन करू व आत्मदहन ही करू असा इशारा दिला आहे.
काय आहेत मागण्या
१) सर्वे नं १९/असं साईनगर मामुर्डी आझाद नगर मधील डी पी रस्ता ताब्यात घेऊन विकसित करणे २) साईनगर मामुर्डी आझाद नगर मधील सर्व रस्ते ड्रेनेज लाईन टाकणे ३) पाणीचे जुन्या पाईप लाईन काढुन नवीन पाईप लाईन टाकणे ४) विद्युत लाईन भुभीगत खरणे ५) सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल थाॅमस काॅलनी कडे विद्यार्थ्यांना येण्या जाण्या साठी सर्व नं १९/ब रस्ते ताब्यात घेणे ६) आझाद नगर साईनगर मामुर्डी परिसरामध्ये साफसफाई कामगार दररोज पाठविणे व स्वच्छता अभियान राबवुन रस्त्या लगत चे सर्व गवत काढणे ७) अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे ८) रस्त्यावरील स्ट्रिट लाईट नवीन बसविणे व बंद पडलेले लाईट सुरू करणे जर हे मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात देण्यात आले आहे.
या आंदोनला आज पाठिंबा देण्यासाठी भारतीय संविधान समिती रॅली च्या वतीने सर्व पदाधिकारी सह अध्यक्ष डॉ रामदास ताटे तसेच ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने चंद्रशेखर पात्रे मानव आधार सामाजिक संघच्या वतीने बाबु हिरमेठकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास समिती चे सदस्य इरप्पा तेलगु तर देहुरोड फोटोग्राफ असोसिएशन चे शहर अध्यक्ष बाबु टेक्केल आदि नी पाठींबा दिला.