ग्रामस्थ आणी नागरिकांन मध्ये आनंदाचे वातावरण लवकरच या भुयारी मार्गाचे भुमीपुजन विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते होणार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि .:- देहूरोड विकासनगर किवळे हद्दीत ,शिंदे पेट्रोल पंप ते लेखा फार्म दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर भुयारी मार्ग बनविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या कडून हिरवा कंदील मिळाला असून ,त्यासाठी २१ कोटी ७१ लाख ४८ हजार १०१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामाची निविदा काढण्यात आली लवकरच भुयारी मार्गाचे जटील प्रश्न सुटणार आहे हे तर निविदा चे त्याच्या प्रति मिळाल्या आहेत. हे काम लवकरच चालू होणार असून जीवाल्ह्लाचे प्रश्न मार्गी लागला असल्याचे फुले ,शाहू ,आंबेडकर विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी शनिवार ( ता.१८ ) रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देताना दिली. या पत्रकार परिषदेस ,माजी नगरसेवक ,बाळासाहेब तरस ,तसेच गोरख ( दादा ) तरस , दिलीप तरस आणि नवनाथ तरस , अजय बखारीया तसेच विविध वृत्तपत्र ,वृत्त वाहिन्यांचे संपादक ,प्रतिनिधी उपस्थित होते.
विकासनगर किवळे येथील शिंदे पेट्रोल पंप ते त्याच्या समोर असलेल्या उत्तम नगर , देवी वन आणि लेखा फार्म हाऊस , तसेच रोजचे चाकरमानी जाण्या येण्यासाठी नागरिक आपला जीव मुठीत धरून ,राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असे त्यात शालेय विध्यार्थी कामगार नागरिक तसेच लग्न या सारख्या विविध समारंभासाठी लेखा फार्म कडे ,तसेच आयटी कामगार हे धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत होते. या मार्गावर सण २०२३/२०२४ पर्यंत सुमारे दीडशे निष्पपाप लोकांचा बळी गेला आहे. याबाबत आम्ही रस्ते विकास महामंडळाला अनेक वेळा पत्रव्यवहार केला पण रस्ते विकास महामंडळाने या कडे नेहमी दुर्लक्ष केले आणी दीडशे लोकांचे बळी गेलेले लोकांची नोंद देखील केली नव्हती जेव्हा आम्ही आमदार अश्विनी जगताप यांना भेटून पत्रव्यवहार केले तेव्हा आमदार अश्विनी जगताप यांनी या बाबत रस्ते विकास महामंडळाचे चांगली कान उघडनी केले आज पर्यंत ऐवढे जीव घेतले यांची साधी दखल घेतली गेली नाही व नोंद ही केली नाही हे खुपच दुखाची बाब आहे असे खडे बोल अश्विनी जगताप यांनी अधिकाऱ्यांना सुनविले असे माध्यमांना सांगितले आता या निविदा ची अधिकृत माहिती देहूरोड पोलीस स्टेशन कडुन फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांना मिळाली.
धर्मपाल तंतरपाळे यांनी २०१४ मध्ये याच ठिकाणी अनेक वेळा आंदोलन विविध आंदोलने केली त्याची दखल ,शासनाकडून घेतली गेली गेली नाही. इथेच न थांबता त्यानंतर सातत्याने विकासनगर किवळे गावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ,अनेक आंदोलने केली त्यात रास्ता रोको ,धरणे आंदोलन ,जेल भरो आंदोलन , अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन,उपोषण,भर उन्हात रस्त्यावर झोपणे, मशाल मोर्च्या अशा विविध मार्गाने अनेक वेळा आंदोलने केली,आणि शेवटी त्यांच्या या प्रयत्नांना मागणीला यश प्राप्त झाले. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांनी या भुयारी मार्गास मंजुरी दिली असून , या संदर्भात मुख्य , महाप्रबंधक क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून सदर ठिकाणी ४ मिटर रुंदीचे भुयारी मार्ग तयार करण्यास मान्यता मिळाली असून त्यासाठी २१ कोटी ,७१ लाख ४८ हजार १०१ रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असून ,त्या संदर्भात निविदा काढण्यात आली असल्याचे मुख्य प्रबंधक यांनी आंदोलन कर्ते ,तसेच माजी आमदार अश्विनी जगताप ,तसेच विद्यमान आमदार शंकर जगताप यांना कळवण्यात आले असून या निविदाचे प्रत ही त्यांना देण्यात आल्या आहेत.
तब्बल चौदा वर्षे संघर्ष केल्या नंतर हे यश प्राप्त झाले असून , याचा आनंद आम्हा सर्व आंदोलनकर्ते , ग्रामस्थ यांना झाला असल्याचे यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना सांगितले.
हा भुयारी मार्ग जवळ पास ४ ते ५ मीटर रुंदीचा असून त्यातून चार चाकी लहान मोठी वाहने जाणार आहेत.त्यामुळे आता , विकासनगर मधील ग्रामस्थ ,विद्यार्थी , तसेच उत्तम नगर ,देवी वन , किवळे गाव ,तसेच आयटी कामगार ,एकूणच पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास सुखकारक होणार आहे.या भुयारी मार्गासाठी एकवीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून याचे श्रेय ,फुले शाहू आंबेडकर विचार मंच , तसेच माजी आमदार अश्विनी जगताप , विद्यमान आमदार शंकर जगताप तसेच विकासनगर किवळे मधील ग्रामस्थांना जाते ,लवकरच आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या भुयारी मार्गाचे कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले. शेवटी आता या भुयारी मार्ग कामामुळे हजारो लोकांना जीवनदान मिळाले आहे या सर्व गोष्टी चे श्रेय मी आमदार अश्विनी जगताप शंकर जगताप व खासदार श्रीरंग बारणे यांना देतो असे ही धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले.