पिंपरी चिंचवड आयुक्तालय व देहूरोड पोलीस ठाण्याचा वतीने तरुणांना आरोग्यदायी संदेश तर तरूणांचे उत्फुर्स प्रतिसाद.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. २ :- *द दारूचा नव्हे दुधाचा..* सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत दूध पिऊन करावा असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व देहूरोड पोलीस ठाण्याचे अभिनव उपक्रम साजरा करताना
नो व्हिस्की नो बिअर, हॅप्पी न्यू इअर
थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या निमित्ताने तरुणांना व्यसन मुक्त करण्यासाठी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गरमागरम मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. याला नवतरुणांनी चांगला प्रतिसाद दिला आणी गरमागरम मसाला दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत केले पिंपरी चिंचवड आयुक्ताल आणि देहुरोड पोलीस ठाण्याचा वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. *नो व्हिस्की नो बिअर, हॅप्पी न्यू इयरला* व्यसन मुक्ती साठी देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात सहभाग घेऊन समाजाला आरोग्यदायी प्रेरणा दिली तर तरूणांने देखील याला चांगला प्रतिसाद दिला.
हा उपक्रम देहूरोड च्या अंकित पोलीस ठाणे सवाना उपहारगृह उडानपुलाखाली येथे आयोजित करण्यात आला होता. अनेक देहूरोडकर नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे स्वागत व कौतुक केले आहे समाजाला एक चांगले संदेश देण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी तरूणांना व माध्यमातून संदेश देताना म्हणाले कि आज अनेक लोक व्यसनं करून आपले जीवन बरबाद करत आहेत नशापतन करीत असताना अनेक लोक उद्ध्वस्त होत आहे तर अनेक घर बरबाद होत आहे अनेक घरांमध्ये क्लेश भांडणतंटे होत आहे त्यामुळे मुलाबाळांचे जीवन खराब होत आहे तर व्यसन न करता दारूच्या जागी दुध प्या व आरोग्य मुक्त व्हा असे संदेश उपस्थित तरुणांना व नागरिकांना दिला यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश जाधव यांनी ही तरूणांना संदेश देत देहूरोड पोलीस ठाण्याचा वतीने आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले देहुरोडच्या नागरिकांच्या वतीने या अभिनव उपक्रमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या वेळी राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते.
या अभिनव उपक्रम साजरा करताना भारतीय संविधान सन्मान समिती च्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले तर डॉ रामदास ताटे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्याचे व देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व अंमलदार सह पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक करून दरवर्षी हा उपक्रम सुरू राहावे जणे करून हळूहळू लोक व्यसनमुक्त होतील तरूणांनी ही व्यसना कडे न वळता सामाज हित कडे वळावा असे मनोगत व्यक्त केले यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे समितीचे समन्वयक सह सचिव चंद्रशेखर पात्रे, खजिनदार विजय पवार सह खजिनदार समितीचे कार्यकारी समन्वयक व मनसे तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, बाबु हिरमेठकर सदस्य इरप्पा तेलगु हे उपस्थित होते तर या उपक्रमात आर टी आय कार्यकर्ते पोपटराव कुरणे आय बीएन लोकमतचे प्रतिनिधी गणेश दुडम आण्णा भाऊ साठे संस्थेचे अध्यक्ष संजय धुतडमल सामाजिक कार्यकर्ते राकेश सोलंकी असे असंख्य लोक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणी पोलीस अधिकारी पोलिस अंमलदार यांनी केले होते या उपक्रमाला उत्फुर्स प्रतिसाद मिळाला आहे.