डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करा -: श्रीमंत शिवशरण.

देहुरोडच्या ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात कार्यकर्त्याचे जोरदार घोषणाबाजीने दुमदुमून गेले.

-


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहुरोड दि ३० :- अमृतसर दि. २६ जानेवारी २०२५ रोजी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरापासुन जवळ असणाऱ्या हेरिटेज स्ट्रीट येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा निषेधार्थ देहुरोडच्या ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला.






या प्रकरणी अटक केलेल्या माथेफीरु समाज कंटक या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांला कठोरात कठोर शिक्षा व्हावी देशद्रोहा सोबत राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एन एस.ए)नुसार या आरोपीवर कार्यवाही करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे देहूरोड शहर अध्यक्ष व अर्थ मुव्हर्स अध्यक्ष श्रीमंत शिवशरण यांनी केली.

अमृतसर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होण्याच्या घटनेस पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जबाबदार आहेत आप चे नेते अरविंद केजरीवाल हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल फक्त मोठ्या गप्पा मारतात. प्रत्यक्ष मात्र पंजाबमधील आप सरकारचे अमृतसरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.पंजाबमध्ये दलितांची संख्या मोठी आहे. त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झालेले आप चे भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या दुर्घटनेची जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देहूरोड रिपब्लिकन पक्षाचे वतीने करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अमृतसरमधील पुतळा विटंबनेतील आरोपीचे नाव आकाशदिप असुन तो २४ वर्षांचा आहे. आणि तो मोघा जिल्ह्यातील धरमकोट येथील चुंगा वस्तीत राहणारा मजुर आहे. तो ती वर्ष अबुधाबीत काम करुन तो गेल्या वर्षी अमृतसरला राहण्यास आला त्याने प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी ला दुपारी ३:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हातोड्याने प्रहार करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी तेथील संविधान पुस्तक ही जाळून अवमान केला. महामानवच्या पुतळ्याच्या विटंबनेचा हा अत्यंत निंदनीय संतापजनक प्रकार आहे. या प्रकरणी २६ जानेवारी रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी लावण्यात आलेली शिडी का काढण्यात आली नाही. प्रजासत्ताकदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर पोलिस बंदोबस्त का नव्हता , तेथील सुरक्षा रक्षक हे काय करत होते असे अनेक प्रश्न निर्माण होतात याला सर्वस्वी भगवंत महान सरकार हेच जबाबदार आहेत त्यांनी नैतिकची जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावेत असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देहूरोड शहर शाखेचे वतीने श्रीमंत शिवशरण यांनी केली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संविधानाचा विजय असो डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विजय असो,त्या जात्यांध वादी माथेफिरू वर गुन्हा दाखल झालेच पाहिजे, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालेच पाहिजे, असे जोरदार घोषणाबाजीने ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक दुमदुमून गेले यावेळी या निषेधार्थ चे निवेदन ग्राम अधिकारी रवी मेरुत यांनी निवेदन स्वीकारले तर देहूरोड पोलीस ठाण्याचा वतीने पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कणसे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस हवालदार प्रशांत वाबळे हे उपस्थित होते  या निषेध मोर्च्यात  देहूरोड शहर अध्यक्ष अरविंद गायकवाड , अर्थ मुव्हर्स असोसिएशन चेअध्यक्ष श्रीमंत शिवशरण, पश्चिम महाराष्ट्राचे सदस्य इंद्रपाल सिंगर रतू , माजी अध्यक्ष सुनील गायकवाड, सुरेश गायकवाड राहुल गायकवाड ,अशोक चव्हाण , मिलिंद भालचंद्र .  गणेश बनसोडे .उत्तम अलकुंडे , अमित छजेड, जस्सी सिंग रत्तू , चंद्रकांत अनागोंदी असे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post