पंजाबच्या अमृतसर हेरिटेज स्ट्रीट, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना व संविधान जाळल्याचा निषेधार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती देहुरोड सर्व पक्ष एकत्रित होऊन जन आक्रोश मोर्चा व प्रेतयात्रा काढून जाहीर निषेध व्यक्त करणार.

 सर्व पक्ष नेत्यांनी केला भीमसैनिकांना आहवान सर्वानी एक झेंड्याखाली येऊन जन आक्रोश व प्रेतयात्रा मोर्चा मध्ये सहभागी व्हा.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड दि. ३० :- महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाचे प्रकृतीची तोडफोड घटना घडली होती तसेच याचे पडसाद देशभरात उमटले होते आता परत या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे पंजाबच्या अमृतसर हेरिटेज स्ट्रीट येथे जात्यांध वादी माथेफिरूने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तीस फुटी उंच मूर्ती आहे समाजकंटक माथे फिरू आकाशदीप नावाच्या  ईसामाने संविधानाची जाळपोळ केली त्यानंतर शीडीवर चढून तीस फूट उंची असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती  हातोड्याने तोडण्याचे प्रयत्न केले 


या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने माथेफिरू आकाश दीप याची प्रेतयात्रा  काढून जाळण्यात येणार असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती सर्वपक्षीय नेत्यांनी डॉ बाबासाहेब जनरल हॉस्पिटल येथे बैठकित निर्णय घेण्यात आले आहे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या जमलेल्या आंबेडकर अनुयायीनी याबाबत जाहीर निषेध व्यक्त करीत दिनांक २/२/ २०२५ रोजी सकाळी ११:०० वा डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती सर्वपक्षीय लोकांच्या वतीने तिरडी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी संताप व्यक्त करत रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण यांनी देशा मध्ये काही समाजकंटक हे संविधान व बाबासाहेबांच्या पुतळ्याचे विटंबनाचे काम  वारंवार करत आहे हे निंदनीय आहे परभणी प्रकरण ताजे असतानाच परत पंजाबच्या अमृतसर येथे एका मते फिरूनी जात्यांधवाद बांडगूळ संविधान जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला हतोड्याने मारून तोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या निषेधार्थ हे तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने हे तिरडी मोर्चात सर्व पक्ष लोकांनी सामील होऊन एका झेंड्याखाली ही तिरडी मोर्चा काढून सर्वपक्षीय संघटना व भीम अनुयायीनी याचा निषेध करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे पक्षपात हे बाजूला ठेवा व या मोर्चात हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे मत यावेळी त्यांनी जाहीर केले. भारतीय संविधान सन्मान समिती च्या वतीने समितीचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी जाहीर आवाहन करत म्हणाले आज देशांमध्ये वारंवार असे घटना घडत आहेत परभणी प्रकरण ताजे असतानाच आता परत पंजाबच्या अमृतसर हेरिटेज स्ट्रीट येथे जात्यांध जातीयवादी माथेफिरू ने संविधान जाळून टाकले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तीस फुटी पुतळा सीढीवर चढुन या बांडगुळाने तोडण्याचे प्रयत्न केले आहे हा नींदनीय घटना घडत असतात जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हा माथेफिरू हातौडा चालवत होता तेव्हा ते हातोडा प्रत्येक भीम अनुयायीच्या काळजावर व छातीवर पडत होता आता तरी कुणी ताटाखालचे मांजर न होता भीम अनुयायी होण्याचा अभिमान बाळगुन एकत्रित व्हा सर्वांना मिळून या जातीवादी बांडगुळाची प्रेत यात्रेत सामील होऊन जन आक्रोश मोर्च्यात भिमसैनिकांनी सामिल व्हा असे जाहीर आवाहन डॉ रामदास ताटे यांनी केली. पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे धडाडीचे नेते परशुराम दोडमणी यांनी अमृतसर येथे घडलेल्या निंदनीय घटनेच्या निषेध व्यक्त करत म्हणाले आज प्रत्येक ठिकाणी विविध घटना घडत आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने सर्व भीमसैनिकांना माता भगिनीना सर्व पक्षांना आवाहन करतो की आप आपले मतभेद बाजूला ठेवा सर्वांनी एकमताने एक दिलाने या निंदनीय घटनेच्या निषेध करण्यासाठी, ज्या माथेफिरूने हारमखोराने संविधान जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्यावर हातौडा चालविण्याचा काम केले आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी व त्याला फाशीची शिक्षा मिळण्याची हा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते दिलीप कडलक यांनी अमृतसर हेरिटेज स्ट्रीट येथे जे घटना घडली आहे हे खुपच कष्टदायक आहे व नींदनीय घटना आहे तर याचा निषेध व्यक्त करणे हे गरजेचे आहे प्रत्येक पक्षांनी वेगवेगळ्या मोर्चे काढण्यापेक्षा सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने एकजुटीने हा मोर्चा काढला पाहिजे व सर्वजण हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कडलक यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण भारतीय संविधान सन्मान समिती चे अध्यक्ष डॉ रामदास ताटे समन्वयक मोझेस दास सह खजिनदार बाबु हिरमेठकर सहसचिव चंद्रशेखर पात्रे खजिनदार विजय पवार सदस्य इरप्पा तेलगु, बाबु टेक्केल आरपीआयचे नेते दिलीप कडलक, वाहतूक आघाडीचे गांधी घौसर, रिपब्लिकन पक्षाचे नेते अमित छाजेड, जेष्ठ नेते अरविंद गायकवाड, इक्बाल शेख, गणेश बनसोडे, जेष्ठ नेते सुनिल गायकवाड, उत्तम अलकोंडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post