छत्रपती ग्रुप पत्रकारांच्या पाठीशी कायम ठाम राहणार - प्रमोद दादा पाटील

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड : छत्रपती ग्रुप समाजातील विविध घटकांच्या पाठीमागे ठाम उभा आहे तसाच पत्रकारांच्या पाठीशीही ठाम उभा राहणार पत्रकार समाजाच्या हिताचे लेखन करून समाजाला दिशा देतात दत्तवाड परिसर पत्रकार संघाने समाज हिताचे काम केले असून यापुढेही त्यांनी आपले काम असे सुरू ठेवावे त्यासाठी छत्रपती ग्रुप त्यांना कायम सहकार्य करेल असे प्रमोद दादा पाटील यांनी काढले ते दत्तवाड ता. शिरोळ येथे मराठी पत्रकार दिन व रेणुका यात्रा निमित्त पत्रकार सन्मान सोहळा व गाथा महाराष्ट्राची या लोककलेच्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभात बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे होते. यावेळी गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले ,जानकी वृद्धाश्रम चे प्रमुख बाबासो पुजारी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष युवराज घोरपडे प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली तर मुन्नाभाई नदाफ ,संजय सुतार  ,मुस्ताक अपराध ,इसाक नदाफ, जहांगीर रणमल्ली युनूस लाडखान, मंदा देशपांडे ,भाऊसो चौगुले ,रमजान नदाफ ,विश्वास कांबळे मिलिंद देशपांडे  या  पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . गाथा महाराष्ट्राची या लोककलेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

   बबनराव चौगुले यांनी यावेळी पत्रकारांनी वेळोवेळी केलेल्या लिखाणाचा उल्लेख करून पत्रकारांना बळकटी देण्याचे काम समाजाने केले पाहिजे ते आम्ही करतो यापुढेही करत राहील असे आश्वासन दिले. युवराज घोरपडे, बाबासाहेब पुजारी, चंद्रकांत कांबळे ,राणी खेंलापुरे यांनी मनोगते व्यक्त केली. 

यावेळी अभिनंदन पाटील ,दत्ता धुमाळे, विश्वास कांबळे, सोनाली सूरवशी  उपस्थित होते.प्रथम स्वागत व प्रास्ताविक पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले आभार दिलीप शिरढोणे यांनी मानले तर सूत्रसंचालन रमजान नदाफ, चंद्रकांत कलगी यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 


  

Post a Comment

Previous Post Next Post