प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड : जंहाॅंगीर रणमली :
डिसेंबर व जानेवारी महिना म्हणजे स्नेहसंमेलनाचा होय. शालेय मुलामुलींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलनाचा. दत्तवाड ता.शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळा कन्या व कुमार विद्या मंदिर शाळेचे संयुक्त स्नेहसंमेलन शुक्रवार दि.१० जानेवारी २०२४ रोजी सरपंच चंद्रकांत कांबळे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलनाने पार पडले.
विविध प्रकारच्या गीत व नृत्याच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.छोट्या बालचमूंच्या तालबद्ध व लयबद्ध नृत्यावर खुश होवून बक्षिसांची बरसात केली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील,अकबर काले,बाबूराव पोवार,प्रवीण सुतार,अनिता कडाके, मनिषा चौगुले,जितेंद्र दावणे,कल्लाप्पा कडाके,केंद्रप्रमुख संजय निकम,केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे, मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,रविंद्र सिदनाळे,सुनिता खटावकर यांचेसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भालचंद्र खोत,रावसाहेब पाटील,शरद अवघडी,विनायक कांबळे,रुकसाना नदाफ, जयश्री निर्मळे, ज्योस्ना सुतार,संजीवनी देसाई, तांबे मॅडम यांनी परिश्रम घेतले.नृत्यदिग्दर्शन कु.योजना पवार व जितेंद्र बिरणगे यांनी केले.चंद्रकांत मंडप डेकोरेटर्स,विकी कांबळे (साऊंड सिस्टीम) यांचे अनमोल सहकार्य लाभले.