प्रेस मीडिया लाईव्ह ;
दत्तवाड: प्रतिनिधी : जंहाॅंगीर रणमली
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास मनाची तयारी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जिद्द व आत्मविश्वास असल्यास यश मिळते असे प्रतिपादन सौ.निलम दिलीप शिरढोणे यांनी केले.
जिल्हा परिषद कोल्हापूर अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत वरीष्ठ गट मुलींच्या कबड्डीत अजिंक्यपद मिळविलेल्या कन्या विद्या मंदिर हेरवाडच्या कबड्डी संघातील संचिता दिनकर माळी,आदिती अरविंद पाटील,ऋतुजा राहूल बरगाले,सलोनी श्रीकांत वाघे,भूमिका बसगोंडा पाटील, देवयानी किरण नेर्ले,साक्षी संदिप बत्ते,अंजली संजय सौदे,सृष्टी शशिकांत बरगाले,समीक्षा सचिन कांबळे,समृध्दी रमेश स्वामी,पूर्वा अनिल घोलप व कुस्तीपटू आरोही अनिल हळाळे या मुलींच्या शिरढोणे परिवारामार्फत आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होत्या. शालेय साहित्य व खाऊ देवून यशस्वी मुलींचे कौतुक करण्यात आले.याप्रसंगी मालूबाई शिरढोणे,श्रध्दा शिरढोणे,श्रेया शिरढोणे व दिलीप शिरढोणे उपस्थित होते