सौ.बिस्मिल्लाह मुजावर यांचे पुस्तक उर्दू विद्यार्थ्यांसाठी दिशा देईल:आ.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर

 इयत्ता दुसरी प्रज्ञाशोध मार्गदर्शिका "मंजिल ब मंजिल"(उर्दू माध्यम)चे प्रकाशन.


प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड : प्रतिनिधी :

उर्दू वि.मं.औरवाड शाळेच्या उपक्रमशील,विद्यार्थी प्रिय, आदर्श शिक्षिका ज्यांनी शाळेत स्पर्धा परीक्षेचा पाया रचला अशा बिस्मिल्लाह आयुबअली मुजावर यांनी लिहिलेल्या उर्दू माध्यमातील इयत्ता दुसरी प्रज्ञाशोध मार्गदर्शिकेचे प्रकाशन आ.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दत्तवाड येथे झाले.ही मार्गदर्शिका उर्दू माध्यमांच्या मुलांसाठी दिशा देणारी ठरेल असे उद्गार शिरोळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रकाशनाच्या वेळी काढले.

     आजच्या या स्पर्धात्मक युगात जि.प.कोल्हापूर मार्फत इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत इ. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते.अशा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास पहिलीपासूनच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने ही मार्गदर्शिका मैलाचा दगड ठरणार आहे. मागील वर्षभरात अतिशय कष्ट घेऊन अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून सौ.बिस्मिल्लाह मुजावर यांनी इयत्ता दुसरीसाठी मार्गदर्शिका तयार केली आहे.विशेषतः उर्दू माध्यमासाठी प्राथमिक स्तरावर अशी कोणतीच स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शिका अस्तित्वात नसल्यामुळे अतिशय तळमळीने व आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.याचा फायदा फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर राज्यातील सर्व उर्दू शाळांना ही पुस्तक आपण उपलब्ध करून देवू असे अभिवचन आ.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रकाशनावेळी दिले.त्यामुळे या पुस्तक निर्मितीसाठी घेतलेले कष्ट सार्थ ठरले असल्याची भावना सौ.मुजावर यानी व्यक्त केली..

      जसे इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये भाषा व गणित आणि इंग्रजी व बुद्धिमत्ता असे चार विषय असतात.त्याचप्रमाणे या पुस्तिकेत अशा चार विषयांचा सखोल अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.जेणेकरून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होईल.

        मार्गदर्शिका तयार करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोळ च्या  गट शिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी,जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार,विस्तार अधिकारी,दिपक कामत,अनिल ओमासे,एन.वाय.पाटील, केंद्र उर्दू शिरोळ व कुरुंदवाड चे केंद्रप्रमुख हाजी.रियाजअहमद चौगले,मुख्याध्यापिका जकीया मोअजम चौगले यांनी प्रोत्साहन दिले.दिलीप शिरढोणे,मेहबूब मुजावर,आसिफ मुजावर यांनी मार्गदर्शन केले.नियामत मकानदार अध्यापक पी.एम.श्री.उर्दू विद्यामंदिर चंदगड यांनी पुस्तकाचे सर्व टायपिंगचे कार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post