प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील खडकेवाडा येथील स्वप्निल अशोक पाटील (वय 27) याचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी आरोपी आशितोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील (वय 25.रा.कौलगे ,ता कागल) आणि सागर संभाजी चव्हाण (वय 34 .रा. चिखली, ता.कागल ) या दोघांना अटक केली.हा प्रकार शुक्रवार (दि.17) रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास उघडकीस आला.याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि मूरगूड पोलिसांना खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथके तयार करून तपास चालू केला.हा खून एका निर्जन स्थळी झाल्याने कोणताही साक्षीपुरावा नसताना तपास पथकाने त्याचे गाव ,वर्णन आणि मृतदेह मिळालेले ठिकाण याची माहिती घेत तपास चालू केला.या पथकातील पोलिस व मुरगूड पोलिस यांनी एकत्रीतपणे तपास चालू करून स्थानिक लोंकाच्या मदतीने माहिती घेत असताना खून झालेल्या इसमाचे नाव स्वप्निल अशोक पाटील असल्याचे समजले.याचा पुढ़ील तपास करीत असताना यातील मयत स्वप्निल आणि त्याच गावातील आशितोष पाटील आणि त्याचा मित्र असे तिघे जण दि.15 जाने.रोजी एकत्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर मयत स्वप्निल हे घरी परतले नसल्याने मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी आशितोष पाटील याला रहात्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला मित्र सागर संभाजी चव्हाण याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी चिखली येथुन सागर चव्हाण याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता यातील मयत स्वप्निल याने आरोपी आशितोष पाटील यांच्या चुलत बहिणीची छेड काढली होती.याचा राग मनात धरुन स्वनिल याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर पेट्रोल ओतुन पेटवून दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि मुरगूड पोलिसांनी एकत्रितपणे तपास करून अवघ्या चार तासांत खूनाचा गुन्हा उघडकीस आणला .याचा पुढ़ील मुरगूड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक शिवाजी करे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई ,करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा.पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस रोहित मर्दाने,विजय इंगळे,युवराज पाटील ,राजू कांबळे,बालाजी पाटील,समीर कांबळे,नामदेव यादव यांच्यासह आदीनी केली.