प्रेस मीडिया लाईव्ह:
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोटारसायकली चोरुन त्याची चाके काढ़ुन विहीरीत मोटारसायकली फेकून देणारयां आरोपी वैभव यशवंत माने (वय 28.रा.मुळगाव कुरळप ,जि .सांगली .सध्या रा.रामचंद्र मोरे यांच्या घरी भाड्याने,शिये,ता.करवीर) आणि दिपक दादासो शिसाळ (वय 31.रा.विठ्ठलनगर ,शिये) यांना अटक करून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हयात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढ़ल्याने त्याचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.त्या अनुशंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना शिये येथील वैभव माने हा काही काम धंदा करीत नसून मोटारसायकल चोरून त्याचे पार्ट काढ़ुन विक्री करीत असून त्याच्या घरी मोटारसायकलीचे पार्ट असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार (दि.17) रोजी पोलिसांनी वैभव माने यांच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात चार मोटारसायकलीची आठ चाके सापडली.ती जप्त करून त्याच्याकडे चौकशी केली असता शिये गावातील विहीरीत मोटारसायकली टाकून दिल्याची माहिती दिली.पोलिसांनी त्या विहीरीची पहाणी केली असता त्यात पाणी जास्त असल्याने त्या मोटारसायकली जीवनरक्षक दिनकर कांबळे आणि तेथील नागरिकांच्या मदतीने चार मोटारसायकली पाण्याबाहेर काढ़ल्या.या बाबत चौकशी केली असता त्याने आपला साथीदार दिपक शिसाळ याच्या मदतीने क.बावडा ,सनराईज हॉस्पिटल,शिवाजी पार्क,डी मार्ट येथून चोरल्याची कबुली दिली.सदरच्या मोटारसायकली 6 ते 7 महिन्यापूर्वी चोरीच्या असून याची लक्ष्मीपुरी आणि शाहुपुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हयांची नोंद असल्याची माहिती मिळाली.या आरोपीनी काही मोटारसायकली पंचगंगा नदीत व काही ठिकाणच्या विहीरीत टाकून दिल्याची कबुली पोलिसांना दिल्याने त्या दृष्टीने तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकली विहीरीत का फ़ेकत होता.याबाबत चौकशी केली असता चोरीच्या मोटारसायकलची विक्री केली तर आम्ही पोलिसांना सापडून पोलिस आपल्याला अटक करतील ,म्हणुन चोरलेल्या मोटारसायकलचे चाके काढ़ुन विक्री केल्यास कोणाला कळणार नाही.अशी माहिती वैभव माने यांनी पोलिसांना दिली.या दोघांना अटक करून पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा.पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस विलास किरोळकर ,रामचंद्र कोळी,सुरेश पाटील,सागर चौगुले,अमित सर्जे,सागर माने,रुपेश माने,विनोद कांबळे चालक राजेंद्र वरंडेकर आणि सुशिल पाटील यांनी केली.