खुन करून हल्लेखोर झाले पसार ओळखीच्या मुलानीच केला घात.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
मावळ दि. ३१ :- तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या नजीक एका तरुणावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत तरुणाच मृत्यू झाला आहे.तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या नजीक एका तरुणावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. आर्यन शंकर बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन) असं या तरुणाचे नाव आहे. तळेगाव येथील सरस्वती विद्यालयासमोर किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. आर्यन शंकर बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन) असे यामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) दुपारी घडली. आर्यन बेडेकर याच्यावर त्याच्याच ओळखीचे शिवराज कोळी, संतोष कोळी, आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे यांनी हल्ला केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तळेगाव परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आणि संशयित यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयितांनी आर्यनवर कोयता व धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये त्याचा चेहरा व डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला.
हल्ला केल्यानंतर संशयित पळून गेले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.