प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - मुक्तसैनिक वसाहत परिसरातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार बुधवारी (दि. १५) सकाळी ९ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जयकुमार जनार्दन करवडे (वय ५७, रा. श्रीकृष्ण सरस्वती अपार्टमेंट, मुक्तसैनिक वसाहत) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी जयकुमार करवडे त्यांची मुलगी डॉक्टर असून ती इचलकरंजीत असते. मुलगा खासगी नोकरी करतो. करवडे दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मुलगीकडे इचलकरंजीला गेले होते. मुलगा राजवर्धन याची रात्रपाळीची डयुटी असल्याने मंगळवारी रात्री ११.४० वाजता तो घरातून ड्यूटीसाठी गेला. बुधवारी सकाळी ९ वाजता राजवर्धन घरी आला असता फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटलेला दिसला. त्याने आत जाऊन पाहिले असता तिजोरी फोडली होती. इतरत्र साहित्य विस्कटलेले होते.
राजवर्धन यांनी तत्काळ वडिलांना घटनेची माहिती दिली. करवडे दाम्पत्य इचलकरंजीतून घरी आले. जनार्दन करवडे यांनी शाहुपूरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतू परिसरातच श्वान घुटमळले. यावरून चोरी केल्यानंतर चोरटे दुचाकीने तेथून पळाले असावेत असा अंदाज वर्तविली जात आहे.
फिर्यादीकडे पोलिसांचे दुर्लक्ष.
फिर्यादी हे सकाळी दहा वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.तिथे बराच वेळ जनार्दन करवडे हे पोलिस ठाण्यात बसून होते. त्यांचा सायंकाळपर्यंत जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पोलीसांनी त्यांची तक्रार लवकर लिहून घेतली नाही.असे फिर्यादीचे म्हणणे आहे.चार ते पाच तास त्यांना ताटकळत ठेवले. पोलीसांच्या अशा वर्तणूकीबद्दल करवडे यांनी नाराजी व्यक्त केली.