एटीएम मशीन फोडून 19 लाख लुटणारया राजस्थानच्या चौघांना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई .

 मुक्तसैनिक वसाहतीमध्ये सहा  लाखांची धाडसी घरफोडी.        दिड लाख रुपये रोख रक्कमेसह इतर वस्तुचा समावेश.



 

    चोरी करून जाताना त्यांच्या  कारने दिली पोलीस व्हॅनला धडक .चोरीतील  रक्कमेचा शोध चालू.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

चंदगड  - कोवाड येथील  बँक ऑफ इंडिया या  बॅँकेचे एटीएम मशिन फोडून त्यातील १८ लाख ७७ हजार रुपयांची चोरी झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने  कारच्या नंबरवरून राजस्थान पर्यत शोध घेत आणि  पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पालघर येथून  चौघांना अटक केली. त्यांनी एटीएम मशिन फोडून रक्कम चोरल्याची कबुली दिली आहे. मात्र पैसे कोठे ठेवले याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. संशयीतांना चंदगड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यात तस्लीम इसा खान (वय २०),अलीशेर जमालू खान (वय २९), तालीम पप्पू खान (वय २८),अक्रम शाबू खान (वय २५.सर्व  रा.चौघे छोटे मश्जीद जवळ,सामदिका, ता. पहाडी, जि.भरतपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. चोरलेली रक्कम त्यांनी आपले मित्र इस्माईल, अकबर, सलीम यांच्याकडे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे  पोलीस  तिघांचा  त्यांचा शोध घेत आहेत.

५ जानेवारी,२०२५ रोजी कोवाड (ता.चंदगड) येथील  बँक ऑफ इंडिया या   बॅँकेचे एटीएम मशिन गॅस कटरच्या मदतीने  फोडून चौघा चोरट्यांनी यातील १८ लाख ७७ हजार,३९० रुपयांची रक्कम लंपास केली होती. चोरी केल्यानंतर संशयीत आरोपीं कारने  भरधाव वेगाने जात असताना ती  कार रस्त्यात बंद पडली. तेथून जाणाऱ्या पोलीस पथकास रस्त्याकडेला असलेली ही कार दिसली. मात्र त्यामध्ये कोणीच नव्हते.


पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना करण्याचे आदेश दिले होेते. सहा. फौजदार चेतन मसुटगे,उपनिरीक्षक जालींदर जाधव या दोघांनी दोन वेगवेगळी पथके केली होती. दोन्ही पथकाकडून तपास चालू होता. पोलीसांनी घटनास्थळावरून माहिती घेतली. तसेच कारचा शोध घेऊन त्याचा नंबर तपासत त्या  कारला त्यांनी बनावट नंबर लावल्याचे स्पष्ट झाले. कारच्या चेस नंबरवरून मुळ नंबर शोध घेऊन ती कार राजस्थान येथील सद्दाम खान याच्या नावावर कार असल्याची माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक  पथक राजस्थानला गेले. तेथून सदद्दाम खान याचा शोध घेऊन  त्याच्याकडे चौकशी केली असता  त्याने  आपला मित्र तस्लीम खान याने नातेवाईक आजारी असल्याचे सांगून कार मागून नेली असल्याचे सांगितले . मात्र कार नेल्यापासून त्याचा संपर्क झाला नसल्याचे सांगितले. सदर आरोपी तस्लीम खान व त्याचे मित्र पालकर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीसांनी पालघर येथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले.


त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपण एटीएम फोडल्याची कबुली दिली. मात्र पैसे कोठे ठेवले आहेत. याबाबत ते मित्रांची नावे घेत आहेत. पोलीस संशयीतांच्या मित्रांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे - पाटील ,गडहिग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर , चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील, नेसरीचे एपीआय बाबा गाढवे, दीपक घोरपडे, अमित सर्जे, महेश पाटील, राजू कांबळे, प्रशांक कांबळे, समीर कांबळे, हंबीर अतिग्रे,अनिल जाधव, नामदेव यादव, राजेंद्र पताडे, रामकुमार माने यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post