प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - रमाई योजनेचे उर्वरीत दोन हप्ते देण्यासाठी तक्रादाराकडुन 10 हजारांची लाच घेताना अविनाश अशोक सुतार (वय 33.रा.हनुमान मंदीर जवळ,हसूर दु.ता.करवीर ) याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली.आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रार यांच्या आईला 2023 /24 साली शासनाची रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. त्यांना लाभार्थी म्हणुन त्यासाठी दिड लाख रुपये मंजूर होऊन ते लाभार्थांला पाच हप्त्यात रक्कम दिली जाते.त्यातील तीन टप्याचे एक लाख रुपये त्यांच्या आईच्या नावावर बँकेत जमा झाले होते.उर्वरित दोन हप्ते जमा न झाल्यामुळे तक्रारदार 10/01/2025 रोजी हातकणगले पंचायत समिती मध्ये विचारण्यासाठी गेले होते.त्या वेळी तेथे रमाई योजनेचे काम पहाणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार यांची भेट घेऊन चौकशी केली असता त्यांनी उर्वरित दोन हप्ते देण्यासाठी 13 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.त्या शिवाय रक्कम बँकेत जमा होणार नाही .असे सांगितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत विभागाने या तक्रारीची पडताळणी करून अविनाश सुतार यांनी तक्रारदाराकडे 13 हजारांची लाच मागत त्यात तडजोड करून 10 हजार रुपये देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून तक्रारदाराकडुन 10 हजारांची लाच घेताना अशोक सुतार याला रंगेहात पकडून कारवाई केली.त्याच्या विरोधात मंगळवार (दि.21) रोजी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील,पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला पोलिस विकास माने,सुधीर पाटील,म.पो.ना.संगीता गावडे ,उदय पाटील आणि प्रशांत दावणे यांनी केली.