एटीएम कार्डची अदला बदली करून खात्यातील ८० हजाराची रक्कम लंपास.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर  -एटीएम कार्डाची अदला बदली करून खात्यातील 80 हजार रुपयांची रक्कम लंपास झाल्याची घटना घडली आहे. याची फिर्याद  मोहन देवाप्पा राजरत्न (वय ५७, रा. तामगाव, ता. करवीर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी मोहन राजरत्न  खासगी कंपनीत नोकरीस असून ते  दोन जानेवारी रोजी खात्यातील पैसे काढण्यासाठी ते दसरा चौक येथील राष्ट्रीयीकृत बॅंकेत आले होते. त्यांनी एटीएम मशीन मध्ये एटीएम  कार्ड घालून पैसे काढ़ण्याचा प्रयत्न केला असता राजरत्न यांना पैसे निघत नसल्याने त्यावेळी तेथे उपस्थित असलेली संशयित व्यक्ती मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आली होती . पैसे निघत नसल्याने राजरत्न  कार्ड घेऊन निघून गेले. 

दरम्यान, राजरत्न  यांना बॅंकेतून  बोलत असल्याचे असे सांगून रात्री एकाने त्यांना फोन केला.   इतक्या रात्री बॅंकेतून फोन आल्याचा संशय आल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशा बॅंकेत चौकशी केली असता खात्यातील ८० हजार १२४ रुपये परस्पर काढल्याचे  समजले. दसरा चौकातील एटीएम सेंटरमध्ये संशयितांनी कार्डची अदला बदली करून हा प्रकार केल्याची फिर्याद त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात  दिली.

Post a Comment

Previous Post Next Post