सुप्रसिद्ध बाॅलीवुड नायक सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण, तपास क्राइम ब्रांचकडे

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक घटनास्थळी दाखल, तीन लोकांना घेतलें ताब्यात कसुन चौकशी सुरू.

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

बांद्रा मुंबई :- राज्यात क़ायदा सुव्यवस्था बिघडताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्य मंत्री जावेद भाई सिद्दीकी यांच्या हत्येची घटना घडली होती आणी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाले होते तसेच सलमान खान यांच्या घरा समोर ही गोळीबार धमकी प्रकरण ताजे असता आता परत बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर वार करण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर  वार असे सहा ते सात वार करण्यात आले आहे. मानेवर गंभीर जखम झाली आहे त्याला तातडीने रात्री साडे तीन वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ही सांगण्यात येत आहे दरम्यान, या घटनेचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.  मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी सैफ अली खान यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याकडून कसून तपास करण्यात येत आहे. 


तसेच, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक सैफ अली खानच्या घरी पोहोचले आहेत. त्यामुळे ते आता या प्रकरणी तपास करणार आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विरल भयानी नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये दया नायक सैफ अली खानच्या घरी पोहोचले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, हायप्रोफाईल इमारतीच्या सुरक्षेत एवढी मोठी चूक कशी झाली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना पोलिस ठाण्यात नेलं असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांचे फोनही ताब्यात घेतले आहेत.

------------------------------------

सैफ अली खानवर हल्ला; नेमकं काय घडलं? ----------------------------------

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सैफच्या आसपासच्या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आहे. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे. चोरानं घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post