अभ्यास करत नसल्याने भीतीवर आपटुन गळा आवळून ९ वर्षाचा मुलांचा खुन.

 पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तीघांवर गुन्हा दाखल.

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 पुणे / बारामती :-  अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षांच्या पोटच्या पोराचे  गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे पियुष विजय भंडलकर वय वर्ष ९ असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. 

आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटून, त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलिसांनी वडील विजय गणेश भंडलकर, शालन विजय भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पियुष घरात असताना, वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यास करीत नसल्याने रागवत होते. “तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागतोस माझी इज्जत घालवतोस,” असे म्हणत त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.

ही घटना घडत असताना मुलाची आई शालन भंडलकर हे हजर होती परंतु तिने पतीला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलट पती विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येऊन पडल्याचे खोटे कारण सांगितले. संतोष भंडलकर यांनी मुलाला निरा येथील भट्टड डॉक्टरांकडे नेले. तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगण्यात आले.

डॉक्टरांनी पियुष मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता या त्या तिघांनी पियुषचे प्रेत गावी नेले. मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी करण्यात आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच विजय भंडलकर आणि इतरांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत

Post a Comment

Previous Post Next Post