स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सातारा जिल्ह्यातील तिघांच्या कडुन 91 किलो.गांजा व इतर असा एकूण 23 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गोवा येथे गांजा विक्री साठी चालेल्या फैयाज अली मोकाशी (वय 37.रा.शिवाजी चौक मलकापूर  ता.कराड) याच्या कडुन 10 किलो.आणि सातारा येथील  सोहेल सलीम मोमीन (रा.उंब्रज ,जि.सातारा) समीर  उर्फ तौसिफ रमजान शेख  (वय 21.रा.रहिमतपूर ,कोरेगाव जि.सातारा ) या दोघांच्या कडुन 81 कि.गांजा असा एकूण 91 कि.गांजा आणि इतर असा एकूण 23 लाख 90 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अवैद्य व्यवसाय  अंमली पदार्थांच्या साठा आणि विक्री करीत असलेल्या गुन्हेंगारांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.

दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पथके तयार करून अंमली पदार्थांच्या अनुशंगाने माहिती घेऊन शोध घेत असताना या पथकातील पोलिसांना पोलिस रेकॉर्डवरील फैयाज मोकाशी हा उचगाव मार्गे गोवा येथे गांजाची विक्री साठी जाणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून 10 कि.गांजासह डिओ गाडीसह पकडून हा गांजा कोठून आणला आणि कुठे विकण्यास जात होता याबाबत  त्याच्याकडे चौ कशी केली असता प्रथम त्याने उडवा उडवी केली.त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने उंब्रज येथील ओळखीचा  सोहेल मोमीन यांच्या कडुन आणल्याची माहिती देत स्यम पूर्ण नाव माहिती नाही यास पणजी गोवा येथे विक्री साठी जात असल्याची माहिती दिली.पोलिसांनी फैयाज मोकाशी याला सोबत घेऊन उंब्रज येथील सोहेल मोमीन याला ताब्यात घेऊन फैयाज याला विक्री करण्यासाठी गांजा कोठून आणला याबाबत चौकशी केली असता त्याने रहिमतपूर येथील समीर  उर्फ तौसिफ रमजान याच्या कडुन आणल्याची माहिती दिली.त्या सलीम शेख यांची  सोहेल मोमीन याच्याकडे विचारपूस केली असता  समीर  शेख यांला रहिमतपूर येथील त्याच्या रहात्या  घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याच्याकडे गांजा बाबत विचारले असता त्याने रहात्या घरात गांजाचा साठा केल्याची माहिती दिली.पोलिसांनी त्याच्या रहात्या घरातून 81कि.गांजा हा अंमली पदार्थ  जप्त करण्यात आला.

पोलिसांनी फैयाज मोकाशी याला   विक्री करण्यासाठी जात असताना  उचगाव येथील हायवे  ब्रीज जवळुन 10कि.गांजा व डिओ गाडीसह  ताब्यात घेतले.त्याच्या कडे विक्री साठी दिलेला गांजा सोहेल सलीम शेख यास पकडून त्याच्या मदतीने समीर उर्फ तौसिफ रमजान शेख यांच्या घरातून 81कि.गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला आहे.या तिघां आरोपींच्या कडुन 91कि.गांजा हा अंमली पदार्थ ,एक डिओ गाडी आणि तीन मोबाईल असा एकूण 23 लाख 90 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आरोपी कडुन मिळालेला गांजा कोठून आणला आणि कुठे घेऊन जाणार होते.याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस वैभव पाटील,प्रविण पाटील,अशोक पवार ,परशुराम गुजरे,कृष्णांत पिंगळे,शिवानंद मठपती,नामदेव यादव ,अनिल जाधव ,यशवंत कुंभार आणि हंबीरराव अतिग्रे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post