गांधीनगर येथे झालेल्या खून प्रकरणातील पाच आरोपीसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात.

 गांधीनगर,करवीर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची एकत्रितपणे कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

गांधीनगर- शुक्रवार (दि.10) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास विठ्ठल सुभाष शिंदे (वय 24) याचा खून केल्या प्रकरणी1) शलमन उर्फ शल्या सुरेश कांबळे (वय22) 2) प्रथमेश सुरेश कांबळे (वय 22) 3) शुभम गणेश आवळे (वय21) 4) समीर उर्फ नॉटी दावलसाब नदाफ (वय 23) आणि 5) सोमनाथ दत्ता भोसले (वय 23.सर्व रा.गांधीनगर ,को) व दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण ,गांधीनगर आणि करवीर पोलिसांनी एकत्रीतपणे कारवाई करून ताब्यात घेतले.

गांधीनगर येथे शुक्रवारी रात्री विठ्ठल शिंदे यांचा धारदार शस्त्राने  वार करून खून झाला होता.या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आणि गांधीनगर पोलिसांना तपास करून हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

या अनुशंगाने खूनाच्या गुन्हयांची माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत असताना  प्राथमिक तपासात वरील ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींची नावे निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध घेऊन विविध ठिकठिकाणा वरुन या पाच जणासह दोन विधीसंघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.त्यांच्या कडे चौकशी केली असता दोन दिवसांपूर्वी मयत विठ्ठल आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यात किरकोळ कारणातुन वाद झाला होता.याचा राग मनात धरुन शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विठ्ठल हा मोटारसायकल वरुन एकटाच जात असताना या आरोपीनी रस्त्यात अडवून त्याच्या डोक्यावर ,पोटावर आणि हातावर चाकू आणि कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला.त्याच स्थितीत असलेल्या आरोपींनी डोक्यात दगड घालून ठार मारून पळुन गेले होते.या घटनेची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी दिली होती.या दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण ,गांधीनगर आणि करवीर पोलिसांनी एकत्रितपणे तपास करून अवघ्या तीन तासात उघडकीस आणला. याचा पुढ़ील तपास करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर हे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर ,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव ,गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाना गुळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post