संतोष देशमुख यांना मारण्यासाठी 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, 4 लोखंडी रॉड, 5 क्लच वायर आणि धारधार कत्तीचा वापर



प्रेस मीडिया लाईव्ह :

संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपींना 18 जानेवारी पर्यंच पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदारला 12 दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विष्णू चाटे , सुदर्शन घुले , सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडलाही अटक करण्यात आली.

हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली?

सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केले. तसेच न्यायालयाला संतोष देशमुखांच्या हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली याची देखील माहिती देण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती. लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र , चार लोखंडी रॉड आणि एक कोयता तसेत लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती देखील वापरली होती.

Post a Comment

Previous Post Next Post