संतोष देशमुख हत्याकांडातील आका , पहिल्यांदाच नाव समोर आल्याने उडाली खळबळ

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आले आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सुनावणीदरम्यान, वकिलाने खळबळजनक दावा केला आहे.

आमदार सुरेश धस हे सतत आकाचा उल्लेख करत आहेत. आरोपीच्या वकिलाकडून सुनावणीवेळी आकाचा उल्लेख केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका म्हणजे विष्णू चाटे होय. तो आधीपासूनच कोठडीत आहे, असा दावा वकिलाने केला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आरोपींना 15 दिवसांच्या रिमांडची मागणी पोलिसांनी केली होती. तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असणारे मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक केली असून याप्रकणातील आका म्हणजे विष्णू चाटेला देखील अटक केली आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला आहे.

"बीडच्या प्रकरणातील मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे होय. छोटे आका म्हणजे वाल्मिक आण्णा (Walmik Karad). या आकानं जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि जर मोठ्या आकानं जर आदेश दिला असेल की असं करा, तसं करा असं मला वाटतं नाही. पण समजा असं केलं असेल तर मोठे आका अडचणीत येतील," असा दावा यापूर्वी सुरेश धस यांनी केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post