प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
चंदगड - चंदगड तालुक्यातील कोवाड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची शाखा आहे.त्या शाखेच्या बाहेर एजीएस कंपनीचे एटीम मशीन बसविले आहे.शनिवार (दि.04) रोजी सायंकाळी साडे सात ते रविवार (दि.05) रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी सदरचे एटीएम मशीन गॅस कटर किंवा इतर कोणत्यातरी साधनाने फोडून त्यातील साडे अठरा लाखांची रक्कम क्यश बॉक्ससह लंपास केल्याचा प्रकार या बँकेचे व्यवस्थापक आशिष हरिशचंद्र रोकडे यांच्या निदर्शनास आला असता त्यांनी याची फिर्याद कोवाड येथील दुरक्षेत्र पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच गडहिग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.रामदास इंगवले यांनी घटना स्थळी भेट दिली.या गुन्हयांचा तपास चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए.एस.डोंबे हे करीत असून यातील चोरटे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.