प्रेस मीडिया लाईव्ह :
रस्ता कितीही खाचखळग्यांचा असेल तरीही आपल्या गाडीची टायर ट्यूब पुरेपूर हवा आणि चांगली मजबूत असेल तर अगदी विना अपघात मोठा वेग पकडून सुसाटपणे वेळेत निश्चिच मुक्कामापर्यंत पोहचता येते.अगदी तसंच आयुष्यात प्रामाणिक कष्टाची सोबत घेऊन दररोजचा नानाविध अनुभव पाठिशी घेऊन आणि निश्चित ध्येयाचा पाठलाग करत न थकता ,न खचता वाटचाल सुरु ठेवली की आपोआपच यशाच्या पाऊलखुणा गवसत राहतात.याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे कष्टकऱ्यांच्या नगरी अर्थात वस्ञनगरीतील
हत्ती चौकातील विजय टायर्सचे विजय अशोक सावेकर यांची अगदी शुन्यातून सुरु झालेली वाटचाल आता विजयाच्या ,यशाच्या मुक्कामापर्यंत नेणारी ठरु लागली आहे.विजय सावेकर यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची.त्यामुळे कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून विजय यांनी शिक्षण घेत असतानाच पडेल ती कामे करत जगण्याची लढाई सुरु ठेवली.२००६ साली टायर पंक्चर दुकानात त्यांनी काम सुरु केले.अगदी तुटपुंज्या पगारात काम करत त्या कामातील बारकावे आणि कौशल्य आत्मसात केले.या काळात सहा वर्षे उलटली आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पंक्चर दुकानात काम सुरु करुन टू व्हिलर ,फोर व्हिलर गाड्यांचे पंक्चर काढणे ,व्हाॅल्कनायझिंग करणे ,रिमोल्डींग करणे ,टायर ट्यूब फिटींग करणे ,व्हाॅलसेट करणे अशी कामे शिकून त्यात चांगले कौशल्य आत्मसात केले.यानंतर आता स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाच या विचाराने १२ जुर्ले २०१३ साली हत्ती चौकात विजय टायर्स या नावाने दुकानचा शुभारंभ करुन
ग्राहकांच्या सेवेचा नवा अध्याय सुरु केला.यासाठी यापूर्वी ग्राहकांना दिलेली चांगली आणि तत्पर सेवा खूप उपयोगाची ठरली.आता तर गेल्या ११ वर्षात विजय टायर्स म्हणजे टू व्हिलर आणि फोर व्हिलर गाड्यांचे पंक्चर काढण्याचे आणि टायर ट्यूब विक्री सेवेचे
अगदी विश्वसनीय ठिकाण म्हणून मार्केटमध्ये मोठी ओळख निर्माण केली आहे.मुळात विजय सावेकर यांचा शांत , मनमिळावू आणि इतरांना प्रामाणिकपणे मदत करण्याचा स्वभाव हीच त्यांची खूप मोठी जमेची बाजू आहे.व्यवहारापलिकडे जाऊन खरीखुरी माणुसकी जपणारे विजय आज आपल्या विजय टायर्स दुकानच्या माध्यमातून
गाड्यांचे टायर पंक्चर व विक्री सेवा व्यवसायात चांगले यशस्वी ठरु लागले आहेत.यामागे त्यांचे प्रामाणिक कष्ट ,माफक दरात तत्पर सेवा कारणीभूत ठरत आहे.त्यामुळेच सामाजिक बांधिलकी मानून ग्राहकांना चांगली सेवा देणारे विजय टायर्स आज मार्केटमध्ये विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखले जात आहे.हल्लीच्या काळात आपल्या अवतीभोवती विविध उद्योग व्यवसायात ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन त्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांची संख्या वाढत चालली असतानाच दुसरीकडे विजय सावेकर यांची प्रामाणिक ग्राहक सेवा माञ आजही समाजात चांगुलपणा टिकून आहे ,याचा मनाला भरवसा देत राहते.म्हणूनच विजय सावेकर ( मो.9860903782)यांच्या जिद्द व प्रामाणिक कष्टाचा विजय हा कुणीही अभिमानाने मिरवावा ,असाच दमदार वाटचालीचा आहे.त्याच्या प्रामाणिक कष्टाला सलाम आणि त्यांचा यशाचा आलेख असाच उंचावत राहो , यासाठी त्यांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा !