घोसरवाडचे डॉक्टर ओंकार निंगनुरे यांना पूणे न्यूज एक्सप्रेस तर्फे धन्वंतरी पुरस्कार प्रदान

प्रेस मीडिया लाईव्ह :

पूणे -पुणे येथील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस मार्फत देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार धन्वंतरी 2024 नुकताच पुणे येथील कोरेगाव पार्क येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात घोसरवाड तालुका शिरोळ येथील डॉक्टर ओंकार निंगनुरे  यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

     पुणे न्यूज एक्सप्रेस मार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावर्षीचा धन्वंतरी पुरस्कार घोसरवाड येथे आयुर्वेदिक औषध उपचार करणारे, व अल्पावधीतच कोल्हापूर सांगली सातारा कर्नाटकातील बेळगाव गोवा येथील अनेक रुग्णांना विविध आजारातून आयुर्वेदिक उपचारातून बरे करणारे नामवंत डॉक्टर ओंकार लिंगनूरे यांना पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक डॉक्टर आयुब शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ. प्रा. प्रमोदिनी माने वारणा कोडोली यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले तर आभार पुणे न्यूज एक्सप्रेसचे महेबूब सर्जेखान  यांनी मानले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल डॉक्टर लिंगनूरे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post