प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील प्रशांत मारुती राऊत (रा.शिवतेज चौक ,दानोळी) याने संतोष शांतीनाथ नाईक (रा.अंबाबाई मंदीर शेजारी,दानोळी) याच्यावर धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर ,पोटावर आणि पाठीवर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रविवार (दि.01) रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास गैबी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मैदाना जवळ असलेल्या मराठा सांस्कृतिक भवन येथे घडला आहे.या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी प्रशांत राऊत यांच्यावर खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.
यातील आरोपी प्रशांत आणि मयत संतोष या दोघांनी प्रासा कार्पोरेशन ही इनपोर्ट एक्सपोर्ट नावाची कंपनी सुरू केली होती.या कंपनीत फायदा होत नसल्याने तसेच संतोष ह्या व्यवसायात लक्ष देत नसल्याच्या रागातुन आरोपी प्रशांत याने संतोष याचा धारदार शस्त्राने खून केला.याची फिर्याद मयताच्या नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली.याचा तपास पोलिस निरीक्षक सत्यवान हाके हे करीत आहेत.