ऑल रजिस्टर न्युज पेपर्स असोसिएशनच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी जे वाय पाटील यांची निवड



प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली - ऑल रजिस्टर न्यूज पेपर्स असोसिएशनची मीटिंग नुकतीच संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली . सदर मीटिंगमध्ये संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून संदेश लहरीचे संपादक श्री. जे. वाय. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सदर मिटींगच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार, घर प्रमुख चे संपादक धोंडीराम शिंदे अण्णा उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष अर्थराज्यचे संपादक अल्ताफ खतीब यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यामध्ये पत्रकार दिन, वृक्षारोपण कार्यक्रम, शिक्षक दिन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आदी कार्यक्रमाच्या कामकाजाचा उल्लेख केला.

नूतन जिल्हाध्यक्ष श्री. जे. वाय. पाटील यांनी येणाऱ्या वर्षभरात संघटनेमार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत आणि आगामी कार्यक्रमात करण्यात येणाऱ्या कामाबाबत योग्य ती माहिती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. धोंडीराम शिंदे अण्णा यांनी संस्थेच्या दहा वर्षातील कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, विराट शक्तीचे संपादक विजय कुमार पोतदार, संघटनेचे सांगली महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष कुंभ शिल्पचे संपादक, नित्यानंद कुंभार , संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य, युवाग्राम वार्ताचे संपादक राहुल मोरे, पंकज नाईक आणि संपादक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post