प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युगानयुगे अन्याय झालेल्या समुदायाला सार्वकालिक प्रगतीचा मार्ग दाखविला,त्यांचे नाव हजारवेळा घ्यावे,असे त्यांचे योगदान आहे,ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य करावे आणि फॅशन सारखे शब्द वापरून डॉ.आंबेडकर यांच्या केलेल्या अपमानाबद्दल जाहीर माफी मागावी',अशी मागणी संविधान ग्रुपने निवेदनाद्वारे केली आहे.
संविधान ग्रुपचे सविधान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राकेश सोनवणे,संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वाती गायकवाड,महाराष्ट्र उपाध्यक्ष अर्चना केदारी, पुणे शहर अध्यक्ष गणेश लांडगे,पुणे शहर उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे,महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रवीण सोनवणे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष निकाळजे व सहकाऱ्यांनी आज हे निवेदन प्रसिद्धीस दिले.
'संघ परिवार आणि भाजपचा संविधान विरोधी,दलितअस्मिता विरोधी अजेंडा वारंवार उघडा पडत असून विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे.ज्यांनी हजारो वर्षे अन्याय केला तेच नव्या रूपात मानहानीचे षडयंत्र रचत आहेत.दलित समाज आपला आत्मसन्मान सोडून पुन्हा कदापि गुलामगिरी स्वीकारणार नाही',असे या निवेदनात म्हटले आहे.