प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्र्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कस काय लागू शकतात असा प्रश्न पडला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यामध्ये ‘सर्व निवडणुकी बॅलेट पेपरवरती घ्याव्यात’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी पेठ येथील महाराष्ट्र बँकेशेजारी सह्यांची मोहिम राबविण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकारे आहे. निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२% मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वा., ते ६५.०२% तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ % झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३% वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे ईव्हीएम संदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणूनच सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात ही मोहिम राबवित आहोत.’’
यावेळी असंख्य नागरिकांनी या मोहिमेस पसंती दर्शवली आणि या मोहिमेत सहभाग घेवून सह्या केल्या. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, सचिव रफिक शेख, नगरसेवक अजित दरेकर, लता राजगुरू, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, हनुमंत पवार, सुनिल शिंदे, राज अंबिके, सुनिल घाडगे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, सुजित यादव, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, सतिश पवार, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, डॉ. रमाकांत साठे, अविनाश अडसुळ, राज घेलोत, प्रकाश पवार, प्राची दुधाने, अर्चना शहा, राजश्री अडसुळ, सुंदरा ओव्हाळ, पपिता सोनवणे, प्रिंयका मदाळे, अनिता धिमधिमे, विजया थोरात, जान्हवी दुधाने, प्राजक्ता गायकवाड, विमल खांडेकर, कल्पना शंभरकर, लता घडसिंग, मुन्ना खंडेलवाल, रोहित घोडके, नितीन वायदंडे, अभिजीत महामुनी, सुरेश चौधरी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.