पुणे न्युज एक्सप्रेसचा वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
राष्ट्रीय पुरस्कार मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : - पुणे येथील आघाडीचे वृत्त संस्था पुणे न्युज एक्सप्रेसच्या वतीने आयोजित केलेला पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील कोरेगांव पार्क परिसरात असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद सांस्कृतिक भवनात सोमवार दि.०९डिसेबर २०२४ रोजी दिमाखातात संपन्न झाला उपस्थित मान्यंवरांच्या हस्ते पुरस्कारकर्ते यांना सन्मान चिन्ह, शाल,पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे न्युज एक्सप्रेसच्या वतीने पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मा.मेहबूब सर्जेखान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ॶॅड. आयुब शेख यांचा आणि इतर उपस्थित मान्यंवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुणे न्युज एक्सप्रेस हे मागील चार ते पाच वर्षा पासून समाजातील राजकिय ,कला ,क्रिडा शैक्षणिक सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पाठीवर थाप देऊन सन्मान करीत आहे. यंदा ही राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे एक्स्प्रेस न्यूज च्यावतीने आयोजित केला होता.या सोहळ्यात ६५ विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ॷॅड. आयुब शेख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे मा.मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद (संचालक आणि चेअरमन) व मा.इकबालअन्सारी( मुस्लम ओबीसी अध्यक्ष) हे होते.तर मा.अब्दुल कय्युम अब्दुल रशीद, मा.खंडु इंगळे, मा.डॉ.तुषार निकाळजे आणि मा.फिरोज मुल्ला सर ,सौ.प्रमोदिनी मारुती माने आणि मा.अरुण दिनकर जमादार (साहेब) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच प्रमाणे पुणे न्युज एक्सप्रेसचे सहसंपादक जिलानी उर्फ मुन्ना शेख ,उपसंपादक श्रीकांत कांबळे आणि पुणे न्युज एक्सप्रेसचे कोल्हापुर प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह या पुरस्कार सोहळ्यास पुरस्कारकर्ते आपल्या कुंटुबिया समवेत उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ॶॅड.आयुब शेख (पुणे माजी नगरसेवक ) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मा.मेहबूब सर्जेखान यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करून येथून पुढ़े आपले सामाजिक कार्य अंखडपणे चालू असेच चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.पुणे न्युज एक्सप्रेसने आजतागायत रोखठोक परखड मत मांडुन निर्भीडपणे बातमी देऊन गोर गरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे यापुढे ही असेच लिखाण करून समाजातिल अन्याय अत्याचार दुर करावा पत्रकार हे समाजाचे दर्पण आहे सत्य लिहणे हे पत्रकारांचे काम असे पुणे एक्स्प्रेस न्यूज वृत्त चे संपादक मेहबूब सर्जेखान यांची प्रशंसा केली
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी करून त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या कार्याची प्रशंसा केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दै.लोकमचे पत्रकार मिंलीद देशपांडे यांनी केले. शेवटी आभार पुणे न्युज एक्सप्रेसचे मेहबूब सर्जेखान यांनी मानले.
या कार्यक्रमास राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मंडळी पुरस्कारकर्ते आपले परिवारासह उपस्थित होते तर प्रिंट मिडीया ,इलेक्ट्रॉनिक मिडीया विविध माध्यमाचे पत्रकार या कार्यक्रमात अवार्जुन उपस्थित होते कोल्हापूर येथील मान्यवरांचे बहुमोल सहकार्य लाभले श्री.अरुण दिनकर जमादार (साहेब) पुणे न्युज एक्सप्रेसचे कोल्हापुर प्रतिनिधी मुरलीधर कांबळे आदी उपस्थित होते.
विशेष सत्कारमूर्ती :
मा. बापूसाहेब कांबळे , सौ रश्मी कांबळे यांचा विशेष सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड . अय्युब शेख यांच्या हस्ते करण्यात आले
"पुरस्काराने सन्मानित नावे"
मा.डॉ रामदास ताटे (दर्पण पुरस्कार)
मा.चंद्रशेखर पात्रे (आदर्श पत्रकार पुरस्कार)
मा.हाजी सुलतान नाजा कव्वाल पुणे .
(संगीत सम्राट तानसेन पुरस्कार)
मा.अजहर बाबा कादरी पुणे (आदर्श युवा संपादक पुरस्कार )
मा.मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद पुणे , (मौलाना अबुल कलाम आझाद समाज रत्न पुरस्कार)
मा.मोहम्मद जावेद मौला पुणे , (उत्कृष्ट उर्दू पत्रकारिता पुरस्कार).
मा.आली सय्यद सर पुणे , (राष्ट्रीय द्रोणाचार्य पुरस्कार).
मा.अजिज आयाज शेख पुणे , (उद्योग रत्न पुरस्कार)
मा.ॲड . अक्रम ए बेपारी पुणे , (आदर्श वकील पुरस्कार)
मा.अयाज खान शेरखान पुणे , (राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार)
मा.इम्रान इम्तियाज शेख पुणे. (पुणे रत्न पुरस्कार)
मा.सोहेल समृदिन शेख पुणे , (राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार)
मा.कैलास पवार पुणे , (सर्वोत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार)
मा.अमर जयसिंगराव पाटील , कोल्हापूर , राष्ट्रीय उत्कृष्ट जलतरण योग पटू पुरस्कार)
मा. नथानियल सुज्ञानराव शेलार ज्युनिअर धुमाळ कोल्हापूर , (महाराष्ट्र भूषण)
सौ.प्रमोदिनी मारुती माने (नारी शक्ती पुरस्कार)
अनिता पाढुरंग पाटील ( रणरागिनी गौरव पुरस्कार)
सरीता बाळासो खोत (आदर्श शिक्षिका पुरस्कार)
आरती कुमार साठे (नर्सीग एक्ससिलेयन सीई अवर्प)
पूनम शशिकांत जाधव
(आदर्श अंगणवाडी शिक्षिका पुरस्कार)
सौ ज्योती प्रविण देशमुख
(स्त्री शक्ती पुरस्कार)
निलम जितेंद्र मुरवणे
(उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार)
मा.विश्वास दत्तात्रय कार्वेकर
(सामाज गौरव)
निता पोपट कापरे
(यशस्वी उद्योजिका पुरस्कार)
पल्लवी अमोल भोसले
(राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार)
वर्षा सागर छत्रे
(आदर्श नारी पुरस्कार)
रुपाली दादासो मरगाळे( राष्ट्रीय समाज भूषण)
अरविंद कल्लापा कोठावळे कोल्हापूर , कोल्हापूर रत्न पुरस्कार
मा. मोहम्मद रफीक इब्राहिम मांगुरे सर. इचलकरंजी , महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार
असे विविध प्रकारचे पुरस्कार प्रदान करण्यात आले शेवटी आलेल्या सर्व मान्यवरांना स्वादिष्ट स्नेह भोजन देण्यात आले.