प्रेस मीडिया लाईव्ह :
झाकीर हुसैन भैया यांचे नुकतेच निधन झाले यावर विश्वासच बसत नाही. संपूर्ण कला जगत झाकीर भाईंच्या अशा अचानक जाण्याने पोरके झाले आहे . माझे व झाकीर भैयांचे संबंध १९८० साला पासूनचे. पं.बिरजूमहाराज व झाकीर भाईन बरोबर मी प्रथम कथक नृत्य सोलापूर येथे सादर केले.त्यावेळी झाकीर भाईची पत्नी (टोनी भाभी) ऑंटोनिया पण होती. त्यानंतर बिरजूमहाराजजीं बरोबर कार्यक्रमात झाकीर भाईन बरोबर कायम भेटी होत गेल्या व झाकीर भाईन बरोबर अधिक घनिष्ठ संबंध झाले. मला ते नंदू म्हणून हाक मारत असत. १९९५ साली शिकागो येथे एका कार्यक्रमात झाकीर भाईंनी तबला वाजवला व मी नृत्य केले हे माझे खुप मोठे सौभाग्य! त्यांच्या बरोबर च्या ५० वर्षाच्या सहवासातील सर्व आठवणी आज जाग्या झाल्या आहेत. अतिशय विनम्र, मनमोकळा व प्रेमळ स्वभाव, कोणालाही प्रथमदर्शनीच भुरळ घालणारे व्यक्तिमत्व त्यामुळेच झाकीर भाई सर्वाचेच आवडते होते.
झाकीर भाईंच्या जाण्याने कला क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती आता कधीही भरून येणार नाही. आज कला क्षेत्रातील लखलखता ध्रुव तारा गळुन पडला आहे. ईश्वर झाकीर हुसेन भाईन च्या आत्म्यास शांती दे!
जेष्ठ कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते
9371099
911