७१ जणांनी केले रक्तदान व उत्कृष्ट छात्र सैनिक पुरस्कार वितरण कार्यक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ( प्रतिनिधी ) :
पुणे : मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद,स.प. महाविद्यालय,राष्ट्रीय छात्र सेना आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९७१ सालच्या भारत - पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी विजय दिन निमित्ताने भव्य *रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते.हे शिबिर सकाळी साडे आठ ते दुपारी एक या वेळेत स.प.महाविद्यालयाच्या स्टुडंट्स सेंटर येथे संपन्न झाले यात ७१ जणांनी रक्तदान केले.सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे मेजर अब्बास व मेजर अमृता नायर,प्रणल देखणे यांचे व अन्य सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
याच दिवशी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि स.प.महाविद्यालय,राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने *विजय दिवस* साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात मेजर एच डी मांजरेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ठ एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार रोख रक्कम व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र शिवकुमार मोरे प्रथम पुरस्कार,कॅप्टन राजशी सुंकले द्वितीय पुरस्कार,अभिज्ञा दिक्षित तृतीय पुरस्कार या एन.सी.सी.कॅडेट्सना पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या विशेष प्रसंगी १९७१ च्या युद्धातील भाग घेतलेले ब्रिगेडियर (निवृत्त)अजित आपटे,ब्रिगेडियर प्रकाश गोगले (निवृत्त) प्राचार्य डॉ सुनील गायकवाड,एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त)यांची व्यासपीठावर मुख्य उपस्थिती होती.ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त) यांनी आपल्या मनोगत मध्ये १९७१ युद्धातील प्रत्यक्ष भाग घेतानांच्या केलेल्या अनेक अतुलनीय शौर्याच्या आठवणी सांगितल्या.कार्यक्रमाचे सूत्र संचलन पार्थ केळकर व स्वराज वांडरे यांनी केले. एन सी सी कॅडेटस यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमास निवृत्त एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य,प्रणल देखणे,डॉ गोविंद धुळगंडे,आर्मी ANO, लेफ्टनंट ARMY ANO बी पी भाऊराळे,निवृत्त कर्नल नरेश गोयल,निवृत्त व्हेटरियन्स अविनाश वझल,दिलीप दीक्षित,सुभेदार रामदास काशीद,मधुकर साकोरे,माणिक मुंढे,महावीर सौंदत्ते आदींची मुख्य उपस्थिती उपस्थिती होती.
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद
एअर मार्शल
प्रदीप बापट (निवृत्त)
अध्यक्ष
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद
महाराष्ट्र व गोवा राज्य
मोबाईल
7042533944
फोटो ओळ
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आयोजित विजय दिना निमित्त उत्कृष्ठ पाहिले तीन एन. सी.सी. कॅडेट्स यांना पुरस्कार,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करताना.पाठीमागे प्रमुख पाहुणे
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद तर्फे विजय दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे व रक्तदाते रक्तदान करतांना.