कौशिक आश्रम'च्या व्याख्यानमालेत यंदा धर्माधिकारी, घळसासी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे - कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या कै. बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत यंदा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि संत साहित्याचे व्यासंगी, प्रसिद्ध निरूपणकार विवेक घळसासी यांची व्याख्याने होणार आहेत.

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे ही व्याख्यानमाला होणार असून दोन्ही दिवशी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. व्याख्यानमाला निःशुल्क आहे.व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी शनिवारी, ७ डिसेंबर रोजी अविनाश धर्माधिकारी यांचे 'भारत तोडो षडयंत्र' या विषयावर व्याख्यान होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.रविवारी, ८ डिसेंबर रोजी 'भारताच्या वैभवाचा आधार - माझं घर माझा परिवार' या विषयावर विवेक घळसासी यांचे व्याख्यान होईल. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि कायदेतज्ज्ञ डी. डी. शहा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे 'कौशिक आश्रम'च्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते.पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी केले आहे.

----

अधिक माहितीसाठी संपर्क

श्री. राजाभाऊ पानगावे

९८२२७३९९८४

Post a Comment

Previous Post Next Post