प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पोलीस अधिकार्याला लाच देण्याचा प्रयत्न करणार्या रिअल इस्टेट एजंटला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे.हसनअली गुलाब बारटक्के (वय ४५, रा़ सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड) असे लाच देणार्याचे नाव आहे.
याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे ( सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. आरोपी हसनअली बारटक्के याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१४, ३१६ (२), ३१८(४) अन्वये विश्वासघात व हुंड्यासाठी त्रास दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्याकडे आहे. कदम यांनी या गुन्ह्यात मदत करावी, म्हणून हसनअली बारटक्के याने लाच देण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. परंतु, कदम यांना लाच स्वीकारायची नसल्याने त्यांनी बारटक्के विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. ताडीवाला रोड पोलीस चौकी येथे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना २ हजार रुपयांची लाच दिली असता बारटक्के याला रंगेहाथ पकडण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.