प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात भीषण अपघात झाला आहे. येथे एका डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपरचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोली येथील केसनंद नाका येथील पोलीस ठाण्यासमोर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पुण्यातील या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावतीहून एकूण १२ जण पुण्यात कामासाठी आले होते. त्यातील ९ जणांना डंपर चालकाने चिरडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
अपघातामध्ये एकूण तीन जण जागीच मृत पावले असून इतर सहा जण जखमी आहेत
मृत्युमुखी व्यक्तींची नावे
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्या व्यक्तींची नावे
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे