ब्रॅण्डेड कंपनीच्या बनावट मालाची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून ८ लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ब्रॅण्डेड कंपनीच्या बनावट मालाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिले होते. पुमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत शहरात शोधमोहीम सुरू होती. आंबेगाव बुद्रुक येथील स्टाइलॉक्स फॅशन हब या दुकानात बनावट मालाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. दुकानात मोठ्या प्रमाणावर पुमा या ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो वापरून बॅग, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, चप्पल, जाकीट, ट्राउझर्स आणि बॉक्सर पॅन्टची विक्री सुरू होती. तेथून ८ लाख २ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, गणेश थोरात आणि नागनाथ राख यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post