तिघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलावर सपासप वार करुन खुन केला

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : येता जाता आमच्याकडे का पाहतोस , या वरून पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलावर सपासप वार करुन त्याचा खुन करण्यात आला.श्रीपाद अनंता बनकर  (वय १७) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सिंहगड रोड परिसरातील चरवड वस्ती येथे मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथे पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खुन करण्यात आल्याची घटना ताजी असताना मंगळवारी रात्री चरवड वस्ती येथे आणखी एका अल्पवयीन मुलाचा खुनाचा प्रकार घडला आहे. श्रीपाद बनकर हा शिक्षण घेत होता. त्यांच्याच वस्तीतील तीन चार मुलांशी त्याची यापूर्वी भांडणे झाली होती. जाता येताना एकमेकांकडे का पाहतो, या कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती. याचा राग मनात धरुन तिघा अल्पवयीन मुलांनी श्रीपाद बनकर याच्यावर चॉपरने सपासप वार करुन त्याचा खुन केला. सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post