सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील हॉटेल व्यावसायिक व सतिश वाघ यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे ,  सतीश वाघ  यांच्या हत्येची सुपारी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.या हत्येप्रकरणी वाघ यांच्या पत्नीला पोलिसांच्यागुन्हे शाखेनेअटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे व्यावसायिक होते. 9 डिसेंबर रोजी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. या दरम्यान, ब्लू बेरी हॉटेलच्या बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून त्याचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आरोपींचा शोध घेत होते. सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली होती.. या अपहरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलीस या प्रकरणी युद्धपातळीवर तपास करत होते.

प्रेमप्रकरणातून घडविली हत्या

हत्येतर 16 दिवसांनी हत्येचे खरे कारण समोर आले. प्रेमप्रकरणातून पत्नीनेच वाघ यांची पाच लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली. सतीश वाघ यांना मारण्यासाठी पत्नीने 5 लाख रुपयांची सुपारी हत्या घडवून आणल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रकरण होतं. या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवे येत असल्याने त्यांना पाच लाखाची सुपारी देऊन संपवण्यात आले आहे. याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे. आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीलालाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येचे उलगडल्यानंतर खळबळ उडाली आहे.


अटक झालेल्यांची नावे :


1. मोहिनी वाघ

2. पवनकुमार शर्मा

3. विकास शिंदे

4 . अतिश जाधव – धाराशिव

5. अक्षय जवळकर – सुपारी देण्यात आलेला व्यक्ती.

Post a Comment

Previous Post Next Post