प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:- महाराष्ट्रात झालेली राजकीय गद्दारी, चालू सामाजिक व राजकीय परिस्थिती वर भाष्य करणारे व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांच्या आयोजनातून वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ जानेवारी रोजी बाळकडू ३ वस्त्रहरण” प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर उपक्रमाच्या पोस्टर चे अनावरण आज पुण्यात सामनाचे संपादक,शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रदेश संघटक वसंत मोरे तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .
यावेळी बोलताना अनंत घरत म्हणाले लोकांनी दिलेल्या मतांशी गद्दारी करणारे , ईव्हीएम स्थापित सरकार, फसव्या योजना, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या ह्या राजकारण्यांचे जनतेकडून वस्त्रहरण करणे गरजेचे झाले आहे ह्यासाठी च हे बाळकडू ३ वस्त्रहरण” हे व्यंगचित्रांचे प्रदर्शन आहे.
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे