प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे (औंधरोड) परभणी येथील संविधान शिल्प विटंबना व भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येच्या निषेधार्थ ऐक दिवशी "लाक्षणीक उपोषण" महाराष्ट्र पॅन्थर सेनेच्या वतीने घेण्यात आले याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला सर व पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे यांनी केले आलेले नेते व कार्यकर्ते यांनी निषेध करत आपली मनोगत व्यक्त केली आणि "जबतक सूरज चांद रहेगा तबतक बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा" "संविधान जिंदाबाद" "शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे " अशा घोषणा देण्यात आल्या आणि सर्वांनी तीव्र शब्दात जाहीर निषेध केला
यावेळी महिला कार्यकर्त्यां सौ. शकीला फिरोज मुल्ला, सौ. प्रियाताई, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे, जेष्ठ नेते संजय कांबळे, युवा रिपब्लिकन युथ रिपब्लिकन पुणे जिल्हा अध्यक्ष जीवन घोघडे, युवा नेते आनंद घेडे, जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय जगताप, अल्पसंख्यांक विकास महासघाचे अध्यक्ष रफिक कुरेशी, शिव शक्ती भीम क्रांतीचे अध्यक्ष अरुण भिंगारदिवे, भीम साम्राज्यचे अध्यक्ष गणेश भोसले,जावेद शहा,विनोद सोनवणे, रमेश खरात, शिवाजी आंग्रे,अनिस रोकडे, महेंद्र निकाळजे, किशन गोलेलू, राजेश ओव्हाळ, विशाल रणपिसे, राजेश रेड्डी, प्रवीण चव्हाण, नाना भालेराव, सजीवन महाडिक, न्यानोबा खरात महाराष्ट्र पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते व आदी संविधानवादी शिव फुले शाहू आंबेडकर व अल्पसंख्यांक चळवळीतील नेते कार्यकर्ते उपस्थित होते