प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाच्या वर्षपूर्ती निमित्ताने सोनेरी महाराष्ट्रच्या वतीने श्री रामलला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलला प्राणप्रतिष्ठेचा भव्य आणि देखणा सोहळा पार पडला होता. देशातील व जगभरातील कोट्यवधी हिंदू या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार बनले होते.
रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील नागरिकांनी प्रभू श्रीरामा प्रति आपली निर्मल भक्ती आणि श्रद्धा ठेवून अनेक प्रकारेच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम राबवले. या उपक्रमांची माहिती सोनेरी महाराष्ट्रला पाठवावे. तसेच त्या दिवशी ज्यांनी-ज्यांनी थेट अयोध्येला जाऊन या सोहळ्याचे साक्षी बनले त्यांनीही आपले अनुभव आमच्यापर्यंत लेखी स्वरूपात पोहोचवावे.
या उपक्रमांना व माहितीला २२ जानेवारीच्या अंकात सविस्तर प्रसिद्धी देण्यात येईल. याशिवाय जगभरातील कोट्यवधी हिंदूचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्रीरामांविषयी सर्वांच्याच मनात आज आदर आणि ममत्वाचा भाव आहे. प्रभू श्रीरामांचे जीवनकार्य, त्यातून आजच्या आधुनिक काळात घ्यावयाचे धडे याविषयीचे लेख, कविता, अनुभव आमच्याकडे पाठवावे. हे सर्व साहित्य editor.sonerimaharashtra@
Tags
पुणे