संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पँथर आर्मीची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : परभणी येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची तोडफोड करुन देशद्रोही कृत्य करणाऱ्या दत्ता सोपान पवार वय 42 राहणार मिर्जापुर तालुका जिल्हा परभणी या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .

दिनांक 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वय वर्ष 42 राहणार मिर्जापुर ता जि परभणी या माथेफिरू इसमाने केल्याची घटना घडली आहे .स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे .भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृती आहे देशामध्ये व राज्यांमध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत . संविधानाची विटंबना करणे  हा त्यातीलच एक भाग आहे

संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरू ला  देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी .परभणी येथे संविधानाच्या विटंबने नंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर गुन्हे दाखल करू नये .अन्यथा पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देणात आला .

 यावेळी गृह शाखा विभागाचे तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी पँथर आर्मी च्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारून आपल्या मागण्या शासनाला  कळविल्या जातील असे सांगितले . या शिष्टमंडळात मोहमद जाफर शेख पुणे जिल्हाध्यक्ष ( अल्पसंख्याक आघाडी ) ,जावेदभाई इमाम शेख पुणे शहर कार्याध्यक्ष ,लक्ष्मीकांत कुंबळे महाराष्ट्र प्रदेश संघटक ,मेहबुब कासम शेख शहराध्यक्ष पुणे शहर युवा आघाडी ,अजिज मोहमंद तांबोळी संघटक पुणे संघटक , महेश बाळासाहेब माने  महासचिव पुणे शहर, कृष्णा गंगाधर पिल्ले पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष ,मंहमद औसाब शेख पुणे शहर उपाध्यक्ष ,आंबादस उर्फ रविंद्र राखपसरे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष ( युवा आघाडी ) ,सतीश भालेराव महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,सौ ज्योतीताई झरेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा (महिला आघाडी ) , सौ सिंधुताई तुळवे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा (महिला आघाडी ) हुसेन मुजावर ,समिर विजापुरे , मुकेश घाटगे , मासिक रत्न वार्ताहर संपादक संतोष चव्हाण उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post