—- माजी सैनिकांची फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन—
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : माजी सैनिकांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या विरुद्ध तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले .यावेळी फसवणूक करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करावी तसेच त्यांना न्यायालय पुढे सादर करून हा तपास तत्काळ पूर्ण करून सर्व माजी सैनिकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावे अशी भावना यावेळी सैनिकांनी व्यक्त केली .
सेवानिवृत्त माजी सैनिकानी एस. जी. ट्रेडिंग कंपनी. बीटी कवडे रोड पुणे नावाची एका कंपनीने साधारण शेकडो माजी सैनिकांचे कोटी पेक्षा जास्त पैशाची फसवणूक केली आहे .या बाबतची तक्रार लोकांनी दिनांक 3/8/2022 रोजी मुंडवा पोलीस ठाणे येथे दाखल केली होती. त्याचे एफ.आय.आर नंबर 03/325 दिनांक 3 ऑगस्ट 2024 असून कायदेशीर रित्या गुन्हा दाखल केले आहे. मुंडवा पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांनी 355 लोकांचा जबाब घेऊन सदरचा केस 17 दिवसानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखा येथे वर्ग केली आहे.
सदर केस बाबत सर्व फिर्यादी यांनी वारंवार आर्थिक गुन्हे शाखा पुणे अधिकाऱ्यांना भेटून आमची सर्व हकीकत त्यांच्यासमोर मांडली आहे. एकूण 333 लोक या केस मध्ये फिर्यादी असून सर्वांच्या जाब जवाब झालेले आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी ,त्यांचे सहकारी व इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखा यांनी आज रोजी पर्यंत कोणतीही विचारपूस किंवा तपास केले नाही व यापैकी कोणत्याही आरोपींना आज रोजी पर्यंत ताब्यात सुद्धा घेतले नाही अशी खात्रीलायक माहिती आमच्यापर्यंत आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी यांना आज रोजी पर्यंत का ताब्यात घेतले गेले नाही व वरील सर्व संघटित गुन्हेगारांना का मोकळा सोडले गेले आरोपींना अटक करून न्यायालय पुढे सादर करण्यासाठी का विलंब लावला जात आहे. याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे सदर केसचे इन्वेस्टीगेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर दिले जात नाही.
सर्व देशाची सेवा करून फौज मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रायव्हेट फंडाच्या मिळालेल्या पैशाची पूर्णपणे एस. जी. ट्रेडिंग कंपनी कडे गुंतवणूक केली होती. सदर कंपनीने आमची मोठी फसवणूक केल्यामुळे आम्ही सर्व गुंतवणूकदार यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही सर्वांनी पुणे पोलिसांकडून केली होती मात्र ते पूर्ण होत नसल्याचे आज रोजी आम्हाला दिसून येत आहे. दिलेल्या फिर्यादनुसार सर्व आरोपींना अटक न केल्यामुळे पुणे पोलिसावर आमचा संशय वाढत आहे.
एस.जी. ट्रेडिंग कंपनीचे मालक व सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना अटक करून न्यायालय पुढे सादर करावा याकरिता आम्ही सर्व मिलिटरीतील सेवानिवृत्त कर्मचारी 355 परिवाराचे लोक पुणे पोलीस आयुक्त कार्यालय समोर आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.असून असा इशारा आज आम्ही पुणे श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी देत आहोत. व तसेच आम्ही देशाची सेवा केलेले सर्व सेवानिवृत्त लोक पुणे येथील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनाच्या पद अधिकाऱ्यांना आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून विनंती करतो की कृपया आपण आम्हाला या प्रकरणा मध्ये साथ देऊन न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षाही आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो.
अंजुम इनामदार सामाजिक कार्यकर्ता यांनी सांगितले की पुणे पोलिसांनी सदरचा गुन्हा गांभीर्याने घेतले पाहिजे होते कारण जे लोक प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाची सुरक्षा करतात कुटुंबापासून दूर राहून देशाची सेवा करतात अशा लोकांवर जर काय अन्याय झाला असेल किंवा फसवणूक केली असेल तर अशा केसला प्राधान्य देणे गरजेचे होते मात्र पुणे पोलिसांनी तसे केले नसून जाणून बुजून आरोपींना पाठीशी घालण्याचा काम पुणे पोलिसांच्या वतीने होत असल्याचा आरोप अंजुम इनामदार यांनी केले. सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून न्यायालय पुढे सादर करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये माजी सैनिक व त्यांच्या पत्नी मोठ्या संख्येत उपस्थित होते. माजी सैनिक देवेंदू कुमार माईति, प्रभात वर्मा, सौ अलका शिंदे माजी सैनिक यांची पत्नी, लालसिंग बिजनोई, निकम कमलाकर, सौ मुक्ता चव्हाण, महेश बागडे, रजनीकांत मोरे, कलिंदर त्रिपाठी, धर्मेंद्र यादव, विकास निकम यासह मोठ्या प्रमाणात माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
तसेच या आंदोलनामध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते हुलगेश चलवादी भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड, समाजवादी नेते अन्वर राजन, रिजनल क्रिस्टन सोसायटीचे अध्यक्ष लुकस केदारी, आजाद समाज पार्टीचे सरिता गायकवाड, माजी नगरसेवक मुक्तार शेख, नूर पिरजादे, एम आय पक्षाचे शाहिद शेख, छबिल पटेल, सत्यवान गायकवाड इत्यादी मान्यवरांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
अंजुम इनामदार
सामाजिक कार्यकर्ता
9028402814
दिवेंदू कुमार माईति
सेवानिवृत्त कर्मचारी व तक्रारदार
8368252616