पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : ई.व्ही.एम मशिन घोटाळा मुद्यावरून लक्ष्मण हाके,गोपिचंद पडळकर हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर करीत बेलगाम टीकेचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडी, धनगर (ओ.बी.सी.) समाजातर्फे पुण्यातील कात्रज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.१ डिसेंबर रोजी सायंकाळी हे आंदोलन देवेंद्र धायगुडे -पाटील (पुणे जिल्हा उपाध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी ई.व्हि.एम मशिन घोटाळा च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लक्ष्मण हाके,गोपिचंद पडळकर हे समाजाची फसवणुक करीत असून ते ज्येष्ठ नेते शरद पवार- खासदार सुप्रीया सुळे यांच्या वैयक्तिक गोष्टींवर टीका करीत आहेत. ही टीका थांबली पाहिजे,अशी मागणी करण्यात आली. पडळकर व लक्ष्मण हाके समाजाचे नाव पुढे करून स्वताची पोळी भाजुन घेत आहेत.मंत्री पदासाठी हे लाचार नेते समाजाची घोर फसवणूक करीत आहेत.या दोन्ही मुद्यावर महाविकास आघाडी (ओ.बी.सी.) धनगर समाजाचे वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत,असे देवेंद्र धायगुडे यांनी सांगितले. किरण शिंदे (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष ) अभिषेक साठे, शिवाजी हिरवे, प्रविण धायगुडे, अनिल गवळी, बलराम शिळीमकर, आकाश धायगुडे, संदेश ठोंबरे ,राजु ढेबे, राहुल धायगुडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते