पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा.विद्यार्थ्यांच्या बॅंचेस साहित्य खरेदी टेंडरमध्ये मोठा घोटाळा असल्याचा आप पक्षाचा आरोप.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बॅंचेस साहित्य खरेदीसाठी काढलेल्या फेर ई निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता.आपल्या मर्जितील ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांच्या बॅंचेस साहित्य खरेदी निविदा केली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला असून करदात्या नागरीकांच्या पैशावर डल्ला मारण्याच हा प्रकार असून याची चौकशी करून टेंडर रद्द करून परत टेंडर काढावे.अटी आणि शर्यतीमध्ये बदल करावेत अन्यथा आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याचा इशारा पक्षाचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना मेलद्वारे पत्र पाठवून केला आहे.

नुकतेच महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या बॅंचेस खरेदीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती परंतु त्यामध्ये असणाऱ्या जाचक अटी आणि इतर गोष्टीमुळे या जाहिरातीसंदर्भात महापालिकेच्या जनसंवादमध्ये चर्चा झाली होती. यावेळी आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदऊन सदर निविदा रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान आता आप पक्षाने याबाबत आंदोलनाची भूमिका घेतल्याने सदर टेंडरबाबत महानगरपालिका काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपलाच 

 मा. रविराज बबन काळे 

युवक शहराध्यक्ष

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड 

9673268485

Post a Comment

Previous Post Next Post