प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समिती,पिंपरी- चिंचवड शहर संघटनेची मासिक मिटींग EPS -95 आणि सिध्देश्वर जेष्ठ नागरिक संघ यांच्या मार्गदर्शनाखाली मोरे वस्ती,चिखली येथे संपन्न झाली.या वेळी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शंकराच्या प्रतिमेच्या फोटोचे पूजन करण्यात आले.या वेळी मिटींग च्या अध्यक्षपदी सहसचिव के.पी.पाटील यांची निवड करण्यात आली,
या नंतर पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, महिला शहर अध्यक्षा अलकाताई मोरे,सचिव पांडूरंग नाणेकर व सिध्देश्वर जेष्ठ नागरिक संघ सचिव सुरेश काठोळे यांनी मनोगत व्यक्त केले.या मिटींगला कोषाध्यक्ष सुरेश साळुंके,चिखली अध्यक्ष अशोक भूजाडे, देहूरोड अध्यक्ष हिरामण साळुंके, उपाध्यक्ष किसन तरस,सदस्य गणेश भानुसघरे,शरद चौधरी, सचिव सविताताई शर्मा, उपाध्यक्षा मंगल तानाजी काळभोर तसेच 200 पेन्शनर्स नागरिक या वेळी उपस्थित होते. *यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत साहेब व अन्य राष्ट्रीय पदाधिकारी हे केंद्र सरकारकडे पेन्शन वाढ संदर्भात कशा प्रकारे पाठपुरावा करत आहेत या बाबतची माहिती अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत व उपाध्यक्ष तानाजी काळभोर यांनी दिली* तसेच संघटनेची विभागवार पदाधिकारी व सदस्य संख्येत वाढ झाली पाहिजे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी कार्यक्रमातील सर्व फोटो प्रसिद्धी प्रमुख सुधीर ढगे यांनी काढले व प्रस्ताविक सहसचिव नंदकिशोर डंबे यांनी केले आभार उपाध्यक्ष तानाजी (आण्णा) काळभोर यांनी मानले.
कळावे,
*EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहर*