प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी एड्.) पेठवडगाव या महाविद्यालयाअंतर्गत शुक्रवार दिनांक 27/12/2024 रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा (IQAC) तर्फे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचा विषय *"बी.एड. छात्र अध्यापकांचे देशात व परदेशात नोकरीसाठी कॅम्पस सिलेक्शन"* *"Instant placement for CBSE & IB international school in India and abroad"**हा होता. वेबिनारचे प्रमुख वक्ते डॉ.सुरोजित साहू (सीईओ ऑफ स्कूल फॉर ऑल) पुणे हे होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे आर. एल .होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्राध्यापिका आएशा बिजली यांनी केले व पाहुण्यांची ओळख प्रा. सावंत ए.पी. यांनी केली.आदरणीय C.E.O. सुरोजित साहू यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने तरुणांशी वाढत्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचा जॉब कसा मिळवावा की ज्याचे वेतन एक लाखाहूनही अधिक असेल याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी प्रेझेंटेशन द्वारे अनेक उदाहरणे व दाखले दिले. शिक्षकांचे बायोडाटा रिझ्युम कशा प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने तयार करावे व शिक्षकांमध्ये उत्तम शिक्षक बनण्यासाठी कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत त्याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या इन्स्टिट्यूट मधील सहकारी बलजीत सर, समिता मॅडम यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
माहितीच्या प्रस्तुती करणानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली त्यांच्या शंकांचे निरसन केले विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट प्रश्न विचारले. अशा पद्धतीने संवाद व चर्चा ही संपन्न झाली.
प्राचार्य डॉक्टर निर्मळे आर. एल मॅडमांनी त्या इन्स्टिट्यूट मधील सर्वांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.पवार ए. आर.यांनी मानले. या वेबिनारसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये आजी व माजी बी.एड. छात्राध्यापकांनी सहभाग घेतला.संस्थापक अध्यक्ष मा.विजयसिंह माने साहेब यांचे ही मोलाचे मार्गदर्शन लाभले.शिस्तबद्ध वातावरणात हे वेबिनार पार पडले. .वेबिनार व्याख्यान व चर्चा अशा स्वरूपात राबविण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च कोटीचा जॉब प्राप्त करण्याच्या इच्छेला महाविद्यालयाने पाठबळ देण्याचे काम केले.अशाप्रकारे वेबिनार संपन्न झाला.