प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
निपाणी - निपाणी तालुक्यातील अक्कोळ परिसरात असलेल्या बाळोबा माळ येथे बुधवार (दि.04) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मंगल सुकांत नाईक (वय 50) आणि प्रज्वल सुकांत नाईक (वय 18.रा.अक्कोळ) या आई- मुलाच्या खूनाची घटना घडली आहे.हा खून मुलीच्या नातेवाईकांनी प्रेमविवाहला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा त्या परिसरात दबक्या आवाजात चालू आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिस घटना स्थली जाऊन पंचनामा करून या प्रकरणी हुक्केरी तालुक्यातील कोणकेरी गावच्या दोघां संशयीताना ताब्यात घेतल्याचे समजते.मयत मंगल नाईक यांच्या पतीचे निधन झाले असून त्या मुलगी आणि मुलगा प्रज्वल समवेत अक्कोळ येथे बाळोबा माळ परिसरात रहात होत्या.मंगल नाईक यांच्या मुलीला एकाने लग्णाची मागणी घातली होती.पण मुलीच्या घरच्यानी याला विरोध दर्शविला.
दरम्यान बुधवारी रात्री कोणकेरी गावातील दोघे संशयीत नाईक यांच्या घरी आल्याची माहिती मिळाली.यात या दोघांचा प्रज्वल आणि त्याची आई मंगल याच्याशी वाद झाला.वाद वाढ़त गेल्याने त्या दोघांनी रागाच्या भरात या माय लेकावर धारदार शस्त्रांने जोरदार केलेल्या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.भिमाशंकर गुळेद,अथणीचे मुन्नोळी,ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक नायकवडी यांनी भेट देऊन माहिती घेतली.